Latest

Devendra Fadnavis : ‘हे मालदीव नाही! महाराष्ट्राचे सुंदर कोकण’ : फडणवीस यांची पोस्ट व्हायरल

backup backup

मालवण; पुढारी वृत्तसेवा : मालदीवच्या वादाच्या पार्श्वभूमीवरनंतर आता एक्सप्लोर इंडिया आयलँड्स (#ExploreIndianIslands) या हॅशटॅग सोशल मीडियावर वेगाने ट्रेण्ड होत आहे. भारतातील पर्यटनाला पाठींबा देताना देशातील सेलिब्रिटी पुढे आले असतानाच महाराष्ट्रातील आघाडीच्या नेत्यांनी सुध्दा यात उडी घेतली आहे. या नेत्यांनी सिंधुदुर्ग मधील सुंदर अश्या मालवण येथील देवबाग सारख्या किनाऱ्यांवर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत हे मालदीव नाही…! महाराष्ट्राला लाभलेले हे आपले सुंदर कोकण! असे म्हटले आहे. (Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांनी ही एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देवबाग किनाऱ्याचे काही फोटो पोस्ट करत "हे मालदीव नाही…! महाराष्ट्राला लाभलेले हे आपले सुंदर कोकण! असे म्हटले आहे." जेव्हा तुम्ही भारतातील आयलंड एक्सप्लोर करता, तेव्हा कोकणला भेट देणे चुकवू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थापत्य पराक्रमाचे एक उत्तम उदाहरण पाहून मंत्रमुग्ध व्हा, सिंधुदुर्ग किल्ला ते भारतातील पहिले इंटिग्रेटेड स्कूबा डायव्हिंग स्कूल (एमटीडीसीचे) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग अँड एक्वाटिक स्पोर्ट्स (इसदा) तारकर्ली बीच येथे चित्तथरारक दृश्य आणि भव्य अरबी समुद्रा अनुभवा.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही केले कौतुक

संपन्न निसर्ग अनुभवायचा असेल… डोंगरदऱ्यांमधून पळायचं असेल… समुद्रकिनाऱ्यावर वाळूचा किल्ला बांधायचा असेल… समुद्राच्या लाटांशी मनसोक्त खेळायचं असेल… गणेशोत्सव, शिमगा, जत्रा अशी समृद्ध संस्कृती अनुभवायची असेल… दशावतारी, भजन, डबलबारी, खेळे अशी लोकगीतं गुणगुणायची असतील… आंबा, काजू, फणस, शहाळं या फळांवर ताव मारायचा असेल…. सिंधुदुर्ग सारखी समुद्रातील बेटं आणि त्यावर उभारलेले जलदुर्ग बघायचे असतील… छत्रपती शिवाजी महाराजांचा वैभवशाली वारसा अनुभवायचा असेल… तर परफेक्ट टुरिस्ट डेस्टीनेशन एकच…. स्वर्गाहुन सुंदर असणारं आपलं कोकण ! अशा शब्दात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे.

आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया

आपल्या सुंदर सिंधुदुर्गातील पर्यटनाला नक्कीच चालना देणाऱ्या या पोस्टसाठी देवेंद्र फडणवीस यांचे आभार! अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या पोस्ट साठी आभार मानले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT