Latest

मंगळावर जीवसृष्टी शोधणार ‘हे’ उपकरण

दिनेश चोरगे

वॉशिंग्टन : पृथ्वीचा शेजारी असलेल्या मंगळ या लाल ग्रहावर अनेक वर्षांपासून जीवसृष्टीचे संकेत मिळतात का हे शोधले जात आहे. याचे कारण म्हणजे एकेकाळी मंगळावर अनुकूल वातावरण होते व वाहते पाणीही होते. 'नासा'चे अनेक रोव्हर सध्या मंगळभूमीवर वावरत आहेत. त्यामध्ये 'स्पिरिट', 'अपॉर्च्युनिटी', 'क्युरिऑसिटी'पासून सध्याच्या 'पर्सिव्हरन्स'पर्यंत अनेक रोव्हरचा समावेश होतो.

या रोव्हरवर जीवसृष्टी शोधण्यासाठीचीही काही सहायक उपकरणे असतात. आता ब्रिटनच्या वेल्समध्ये तयार झालेले एक वैज्ञानिक उपकरण मंगळावरील जीवसृष्टीचा छडा लावण्यासाठी मदत करणार आहे. चालू दशकाच्या अखेरीस ते मंगळभूमीवर जाऊन ही मोहीम राबवेल. या उपकरणाचे नाव आहे 'एन्फिस'. या वेल्श शब्दाचा अर्थ 'इंद्रधनुष्य' असा होतो. हे एक इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर असून ते आबेरीस्टविच युनिव्हर्सिटीत विकसित केले जात आहे. ते युरोपियन स्पेस एजन्सीच्या रोजलिंड फँ्रकलिन रोव्हरवर बसवले जाणार आहे. हे सहा चाकांचे रोव्हर 2028 मध्ये मंगळाकडे पाठवले जाईल. हे उपकरण रोव्हरच्या अतिरिक्त कॅमेरा सिस्टीममध्ये बसवले जाईल. ते मंगळावरील वैशिष्ट्यपूर्ण दगड हेरून त्यामध्ये ड्रील करण्यास सुचवेल, जेणेकरून चाचणीतून प्राचीन काळातील जीवसृष्टीचे पुरावे मिळतील.

हे उपकरण बनवण्याचा खर्च 13.4 दशलक्ष डॉलर्स इतका आहे. हे नवे उपकरण रशियाच्या उपकरणाची जागा घेईल. या नव्या उपकरणात असे सेन्सर्स आहेत ज्यांच्या सहाय्याने मंगळभूमीची टेहळणी करून ड्रीलिंग व चाचण्यांसाठी योग्य खडकांची निवड केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT