Electric cycle 
Latest

आता झटक्यात करा सायकलचे रूपांतर इलेक्ट्रिक बाईकमध्ये

backup backup

पुणे : पुढारी वृत्तसेवा

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहने बनवण्याची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. कंपन्या नवीन फीचर्स आणि स्टायलिश लुकसह एकामागून एक इलेक्ट्रिक वाहने लाँच करत आहेत. दरम्यान, एक अशी बातमी समोर आली आहे, ती ऐकून तुमचे मन खुश होईल. भारतातील एका व्यक्तीने असे एक उपकरण तयार केले आहे, जे काही तासांतच तुमची जुनी किंवा नवीन सायकल इलेक्ट्रिक बाइकमध्ये बदलेल. आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. गुरसौरभ सिंग यांनी बनवलेल्या इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट या उपकरणात उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी स्वारस्य दाखवले आहे. त्यांनी या विषयी बोलताना सांगितले सायकलला मोटारसायकलमध्ये रूपांतरित करणारी ही जगातील पहिली रचना नाही, परंतु डिझाइन खूपच चांगले आहे.

काय आहे वैशिष्ट्ये

आनंद महिंद्रा यांनी स्वतः ट्विटमध्ये सायकलच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, या इलेक्ट्रिक सायकलमध्ये उत्तम डिझाइन, कॉम्पॅक्ट, चिखलात चालणे, खडबडीत रस्त्यावर सन्नाट चालणे, अत्यंत सुरक्षित, फोन चार्जिंग पोर्ट अशी वैशिष्ट्ये आहेत.

आनंद महिंद्रा या ई-सायकल किटमध्ये गुंतवणूक करू शकतात

आनंद महिंद्रासह अनेकांची मने जिंकली आहेत. आनंद महिंद्रा यांनी या ई-सायकल किटमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून लिहिले आहे की, व्यवसाय म्हणून हे यशस्वी होईल किंवा नफा देईलच असे नाही, तर या उपकरणात गुंतवणूक करणे माझ्यासाठी अभिमानाची बाब असेल.

सर्वोच्च वेग

DVECK सिस्टीम 25 किमी/ताशी क्षमतेच्या एका सामान्य सायकलला इलेक्ट्रिक सायकलमध्ये रूपांतरित करते. याशिवाय, हे उपकरण स्थापित केल्यानंतर, इलेक्ट्रिक सायकलची रेंज 40 किमी आहे आणि पेलोड क्षमता 170 किलो आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT