Latest

‘या’ पदार्थांमुळे वाढतो रक्तातील ऑक्सिजन

Arun Patil

मानवी शरीर अनेक प्रकारच्या पेशींनी बनलेले आहे. जे एकत्रितपणे ऊती, अवयव आणि नंतर अवयव प्रणाली तयार करतात. या सर्वांसोबत आपल्या शरीरात रक्तदेखील असते, जे अनेक कार्ये करते. रक्त हे पेशी, प्रथिने आणि साखर यांचे मिश्रण आहे, जे शरीराच्या शिरा, धमन्या आणि केशिकामधून जाते. रक्त आपल्या शरीरात अनेक कार्ये करते, परंतु त्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजन पोहोचवणे. मानवी शरीराला चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी रक्तामध्ये ऑक्सिजनचे निरोगी प्रमाण असणे महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करून रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवू शकता, असे तज्ज्ञ सांगतात.

हळद : हळद हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा सर्वात सामान्य आणि लोकप्रिय मसाला आहे. त्याशिवाय अनेक पदार्थ चवहीन आणि रंगहीन वाटतात. अन्नाची चव वाढवण्याव्यतिरिक्त, हळद नायट्रिक ऑक्साईडची पातळी वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे रक्तवाहिन्यांचा विस्तार होतो आणि अवयवांमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त प्रवाह सुधारतो.

पालक : लोहयुक्त पालक आरोग्यासाठी फायदेशीर आहे, कारण त्यात भरपूर पोषक तत्त्व असतात. या पालेभाज्यांमध्ये नायट्रेटचा समृद्ध स्रोत आहे, जो संपूर्ण शरीरात रक्त प्रवाह आणि ऑक्सिजन वाढविण्यास मदत करतो.

डाळिंब : डाळिंब हे लोह, तांबे, जस्त आणि अत्यावश्यक खनिजांचे पॉवरहाऊस आहे, जे महत्त्वाच्या अवयवांना आणि ऊतींना ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यास मदत करते.

एवोकॅडो : या फळाला पोषक घटकांचा खजिनाच मानले जाते. एवोकॅडोमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे, फोलेट आणि कोलीन असतात, जे ऑक्सिजन शोषण सुधारण्यास आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास मदत करतात.

बीटरूट : या मूळ भाजीमध्ये व्हिटॅमिन बी 9, मँगनीज, पोटॅशियम आणि लोह असते, जे शरीरातील नायट्रेटस् काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो.

हा धोका होतो कमी : शरीरातील रक्त शुद्ध असेल, त्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राहिले तर शरीरातील रक्त चांगल्या पद्धतीने प्रवाहित होतो. तसेच शरीरातील धमण्या, ऊती आणि पेशींमध्ये प्रवाह चांगला राहिल्यास हार्टअ‍ॅटॅकचा धोका कमी होतो. तसेच शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होत नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT