Latest

Defence Expo 2022 : ‘डिफेन्स एक्स्पो’च्‍या माध्‍यमातून भारताच्या व्यवसाय कौशल्यांवर जगाचा विश्वास दृढ होईल; पंतप्रधान नरेद्र मोदी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: 'डिफेन्स एक्स्पो' हा कार्यक्रम भारताच्या व्यवसायिक कौशल्यावरील जगाचा विश्वास वाढवेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  व्यक्त केले. गुजरातमध्ये आयोजित 'डिफेन्स एक्स्पो' ( Defence Expo 2022) या भारतीय कंपन्यांच्या उत्पादन प्रदर्शनात ते बोलत होते. या प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

पुढे बोतलाना ते म्हणाले, DefExpo-2022 चा हा कार्यक्रम देशाच्या अमृतकाळात भारताचे एक नवीन आणि भव्य चित्र रेखाटत आहे. हा पहिला कार्यक्रम आहे, ज्यामध्ये, फक्त भारतीय कंपन्याच सहभागी होत आहेत, जिथे फक्त भारतात बनवलेली (मेड इन इंडिया) संरक्षण उपकरणे ठेवण्यात आली आहेत. हा कार्यक्रम म्हणजे यामध्ये देशाचा विकास, राज्यांचा सहभाग, युवा शक्ती, तरुणांची स्वप्ने, धैर्य आणि त्यांच्या क्षमता आहेत.

मला याचा आनंद होत आहे की, आज भारत भविष्यातील डिफेन्स क्षेत्रातील अनेक संधींना आकार देत आहे. देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या डिफेन्स एक्स्पोने एका नवीन भविष्याची जोरदार सुरुवात केली आहे. मला माहित आहे की यामुळे काही देशांचीही गैरसोय झाली आहे. परंतु अनेक देश, सकारात्मक विचारसरणीने आमच्यासोबत येतील. तेसच भारताचे मित्र असलेले ५३ आफ्रिकन राष्ट्र देखील भारताच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील, असेही मत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केले आहे.

मिशन डिफेन्स स्पेस नवनिर्मितीला प्रोत्साहन देईल आणि आपले तिन्ही सैन्यदल मजबूत करेल. संरक्षण क्षेत्रात भारत नवा हेतू, नाविन्य आणि अंमलबजावणीचा मंत्र घेऊन पुढे जात असल्याचेही त्यांनी याप्रसंगी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT