Bheed Trailer 
Latest

Bheed Trailer : राजकुमार रावच्या ‘भीड’चा ट्रेलर रिलीज (Video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' 'भीड' ( Bheed Trailer ) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेने होते असून त्यात ते असे म्हणताना की, 'आज रात १२ बजे से पूरे देश में संपूर्ण लॉकडाऊन होने जा रहा है'. हा ट्रेलर पाहिल्यानंतर कोरोनाच्या लाटेनंतर आपण सर्वांनी राहिलेल्या लॉकडाऊनचा जो त्रास सहन केला आहे, त्याची आठवण होते.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या 'तू झूठा मैं मक्कर' या चित्रपटादरम्यान राजकुमार रावचा आगामी 'भीड' चित्रपटाचा हा २ मिनिटे ३९ सेकंदाचा ट्रेलर पाहायला मिळत आहे. या चित्रपटात कोरोनाच्या माहामारीनंतर देशात लॉकडाऊनदरम्यान सर्वाना झालेला त्रास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात राजकुमार रावने एका पोलीसाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा ट्रेलर लॉकडाऊनच्या वाईट काळाची आठवण करून देत आहे, ज्यामध्ये हजारो लोकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे. चित्रपटाची ही कथा ही वास्तवदर्शी आहे.

दिग्दर्शक अनुभव सिन्हा म्हणाले की, 'भीड हा अतिशय खास चित्रपट आहे, ही एक कथा आहे जी प्रामाणिकपणे सांगण्याची गरज आहे. चित्रपटाचे शूटिंग 'ब्लॅक ॲण्ड व्हाईट' मध्ये करण्यात आले आहे.

या चित्रपटाविषयी बोलताना राजकुमार राव म्हणाला की, 'भीड' हा २०२० च्या भारतातील लॉकडाऊन आणि देशभरातील आणि जगभरातील कोट्यवधी लोकांच्या संघर्षाचे सार टिपणारा चित्रपट आहे. यामध्ये काम करणे हा माझ्यासाठी खूप भावनिक अनुभव होता.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT