नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरबाबतचे कलम 370 रद्द करण्याच्या नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयावर सुप्रीम शिक्कामोर्तब केले आहे. 370 निर्णयाच्या वैधतेवरील हा निकाल ऐतिहासिक ठरला असून, आता जम्मू-काश्मीरचा खर्या अर्थाने, पूर्णपणे व कायमचा विलय भारतीय संघराज्यात झालेला आहे. कलम 370 आता कायमचे हटले आहे. केंद्राच्या या निर्णयाविरुद्ध 23 याचिकांवर 5 न्यायमूर्तींसमोर एकत्रित सुनावणी झाली. यादरम्यान वादी-प्रतिवादी पक्षाच्या 26 वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. तब्बल 16 दिवस सुनावणी चालल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता.फाळणीच्या वेळचे काश्मीरचे महाराजा हरिसिंहांपासून नेहरू, पटेलां
पर्यंतच्या नावांचा उल्लेख सुनावणीत झाला.
5 ऑगस्ट 2019 : कलम 370 रद्द करण्यात आले.
2019 : लगोलग आयएएस फैजल शाह यांच्यासह 23 जणांनी त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. निर्णय घेण्याचा घटनात्मक अधिकार सरकारला नाही, अशी भूमिका यातून मांडण्यात आली.
2020 : मार्चमध्ये केंद्र सरकारच्या 5 न्यायमूर्तींच्या पीठाने या याचिका 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे पाठविण्यास नकार दिला.
ऑक्टोबर 2020 : याचिकांवर सुनावणी सुरू झाली.
14 डिसेंबर 2022 : सरन्यायाधीश चंद्रचूड, न्यायमूर्ती नरसिम्हा यांच्या पीठाने 5 न्यायमूर्तींच्या पीठासमोर सुनावणीचा निर्णय दिला.
11 जुलै 2023 : प्रकरणाची नियमित सुनावणी व्हावी, असा आदेश झाला.
2 ऑगस्ट 2023 : पासून नियमित सुनावणी सुरू झाली.
11 डिसेंबर 2023 : ला निकाल लागला. 370 रद्दवर सुप्रीम शिक्कामोर्तब झाले.
सुनावणीचे 'हे' मुख्य विषय