Latest

अगोदरच ६ मुली, सातवीची भर, सासू माझे जगणे कठीण करेल; अत्यंत करुण चिठ्ठी सोडून माता दवाखान्यातून पसार

मोहन कारंडे

जयपूर : वृत्तसंस्था : मला आधीच सहा मुली झालेल्या आहेत. वंशाला दिवा नाही म्हणून माझी सासू मला आधीच खूप त्रास देते. आता त्यात सातव्या मुलीची भर पडलेली आहे. मी ही मुलगी तुमच्या भरवशावर सोडून जात आहे. तिचा सांभाळ करा. तुमचे फार उपकार होतील आणि जमले तर मला क्षमा करा, अशी चिठ्ठी व आपले नवजात बाळ दवाखान्याच्या आवारात सोडून माता पसार झाली आहे.

राजस्थानातील भरतपूर येथील महिला रुग्णालयात ही घटना समोर आली आहे. सतत मुलीच होतात म्हणून सासरच्या छळाला कंटाळलेल्या या मातेने ज्या कुणाला हे बाळ पहिल्यांदा आढळेल, त्याला उद्देशून या मातेने एक पत्र लिहिले. ही मुलगी तुम्हाला सापडली आहे. आता तिला तुमचीच मुलगी समजा. तिचा सांभाळ करा, असेही तिने चिठ्ठीत नमूद केले होते.

एकाने रुग्णालय आवारात रडत असलेले एकाकी नवजात बाळ पाहिले आणि त्याने याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. यावेळी कडक उन होते. त्यामुळे मुलीला लगेचच रुग्णालयातही दाखल केले. डॉक्टर म्हणाले, कडक उन्हातही मुलीला काहीच झाले नाही. मोकाट कुत्र्यांपासूनही ती बचावली. बालकल्याण समितीचे सदस्य रुग्णालयात पोहोचले. आता मुलाच्या आईचा शोध सुरू आहे. बाळाचा जन्म ३ दिवसांपूर्वी झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT