Latest

दुबईतील सर्वात महागडे घर!

backup backup

दुबई ः संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई ही आता 'नवलाईची नगरी'च बनलेली आहे. अशा या शहरात अर्थातच घरांच्या किमती अधिक आहेत. मात्र, तेथील एका घराची किंमत ऐकताच आपल्या भुवया उंचावू शकतात. दुबईतील हे सर्वात महागडे घर आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. या घराची किंमत 750 दशलक्ष दिरम्स (204 मिलियन डॉलर) म्हणजे भारतीय रुपयांनुसार 1 हजार 675 कोटी इतकी आहे.

या घराच्या बांधणीसाठी इटालियन मार्बल्सचा वापर केला आहे. त्यामुळे या घराला 'मार्बल पॅलेस' असेही म्हणतात. हॉलीवूडच्या ब—ेव्हरी हील्सच्या धर्तीवर एमिरेटस् हील्सवर ही दुबईतील सगळ्यात महागडी प्रोपर्टी उभी करण्यात आली आहे. 60, 000 चौरस फुटांमध्ये हे घर बांधण्यात आले आहे. तरीदेखील यात फक्त 5 बेडरूम आहेत. व 19 बाथरूमसोबतच एक जीम, थिएटर, जॅकुझई आणि एक बेसमेंट पार्किंग देण्यात आली आहे. इथे एकाचवेळी 15 गाड्या एकत्र पार्क करता येऊ शकतात. मार्बल पॅलेसच्या बांधणीसाठी जवळपास 12 वर्षे लागले होते. 2018 मध्ये या घराचे बांधकाम पूर्ण झाले.

हे घर स्थापत्यशैलीचा एक उत्तम नमुना आहे. यात मुख्यतः 19 व 20 व्या शतकातील कलाकृतींचा वापर करण्यात आला आहे. यात पुतळे, पेंटिग यांचा समावेश आहे. या घराचा मालक एक स्थानिक बिल्डर आहे. मार्बल पॅलेसच्या तळमजल्यावर डायनिंग आणि थिएटरच्या रूम आहेत. तर, इनडोअर आणि आऊटडोअर स्विमिंग पूल आहेत. त्याचबरोबर दोन डोम असून 70,000 लिटर पाण्याचे कोरल रिफ अ‍ॅक्वेरिअम आहे. विजेसाठी स्वतंत्र पॉवर सबस्टेशन आणि पॅनिक रूमही आहे. तसेच, घराच्या गार्डन एरियामध्ये 70 हजार स्वेअर फुटांचे गोल्फ कोर्स आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT