औरंगाबाद,पुढारी वृत्तसेवा : आमचा व्यक्तीला नव्हे, तर विकृतीला विरोध आहे. उर्फी जावेद ही सार्वजनिक ठिकाणी जोपर्यंत पूर्ण कपडे परिधान करीत नाही, तोपर्यंत माझा लढा सुरूच राहील, असे भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी रविवारी येथे सांगितले. त्या म्हणाल्या, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी उपडे फिरणे हे भारतीय संस्कृतीला शोभणारे नाही. यामुळेच उर्फी विरोधात आवाज उठवला. या प्रकरणात पोलिस त्यांचे काम करीत आहेत.
हेही वाचा