Latest

राजस्थानात 1980 नंतर भाकपचा आमदारच नाही

दिनेश चोरगे

जयपूर; वृत्तसंस्था : यावेळी 80 राजकीय पक्ष राजस्थान विधानसभा निवडणूक लढवित आहेत. त्यापैकी राष्ट्रीय स्तरावरील भारतीय कम्युनिस्ट हा पक्ष 1957 पासून राज्यात निवडणुका तर लढतो आहे, पण 1980 नंतर या पक्षाचा एकही उमेदवार विजय मिळवू शकलेला नाही.

भाकपने यावेळी उदयपूर ग्रामीण, जोधपूर शहर, गोगुंदा आदी 9 जागांवर उमेदवार दिले आहेत. राजस्थानात 1952 पासून विधानसभा निवडणुका सुरू आहेत. भाकप 1957 पासून लागोपाठ निवडणुका लढवत आला आहे. भाकपने 1980 मध्ये 25 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एक जागा जिंकली होती. 1962 मध्ये या पक्षाचे 5 आमदार निवडून आले होते.

आकडे बोलतात…

14 दिवस आता मतदानाला उरले आहेत.
200 जागांवर 1875 उमेदवार भाग्य आजमावत आहेत.
80 विविध राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार मैदानात उतरविले आहेत.
200 उमेदवार (सर्वाधिक) भाजपने उभे केले आहेत.
199 उमेदवार काँग्रेसचे आहेत. भरतपूरची जागा काँग्रेसने राष्ट्रीय लोक दलसाठी सोडली आहे.
185 जागांवर बहुजन समाज पक्ष, तर 86 जागांवर आम आदमी पक्ष लढतो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT