Latest

Prachitgad Fort : सह्याद्रीची अद्भूत प्रचिती देणारा ‘प्रचितगड’!

backup backup

वारणावती; आष्पाक आत्तार : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि हिंदवी स्वराज्यातील अनेक शूरवीरांच्या पराक्रमाची साक्ष देणारा प्रचितगड हा किल्ला दुर्गमतेमुळे काहीसा उपेक्षित राहिला आहे. परिणामी, या गडावरील एकेक ऐतिहासिक वास्तू आणि वस्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शासनाने वेळीच या किल्ल्याच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.

सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सीमारेषेवर प्रचितगड आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला लागूनच रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याच्या शृंगारपूर या ऐतिहासिक गावाजवळ प्रचितगड किल्ला आहे. हा किल्ला किती पुरातन आहे, याची कागदोपत्री नोंद फारशी आढळून येत नाही; मात्र 1662 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जिंकला होता. गडाच्या पूर्वेला मार्लेश्वर, पश्चिमेला शृंगारपूर गाव, दक्षिणेला नायरी, तर उत्तरेला शिराळा तालुका आहे. निबिड अरण्यातून चालत सुमारे साडेचार ते पाच तासांचा प्रवास केल्यानंतर या गडापर्यंत पोहोचता येते.

प्रचितगड हा किल्ला पाहण्यासारखा आहे. जाण्याचा मार्ग अत्यंत खडतर आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत नाही. त्यामुळे वन विभागाकडून या किल्ल्याच्या संवर्धनासाठी काही करता येत नाही.
– नंदकुमार नलवडे, वनक्षेत्रपाल, चांदोली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT