Latest

Terrorist Attack In Pakistan : पाकिस्तानातील शाळेत गोळीबार, 7 शिक्षक जागीच ठार

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानमधील एका शाळेत गुरुवारी झालेल्या गोळीबारात सात शिक्षकांचा मृत्यू झाला. खैबर पख्तुनख्वामधील पाराचिनार भागात ही घटना घडली. काही शस्त्रधारी लोकांनी शाळेच्या स्टाफ रूममध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

गोळीबारानंतर परिसरात घबराट पसरली. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सह-अध्यक्ष आणि माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. ड्युटीवर असलेल्या शिक्षकांची हत्या ही दहशतवादी घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्षाने निवेदन जारी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अलीकडच्या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये विशेषतः खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये दहशतवादाच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तान सरकार आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) यांच्यातील युद्धविराम संपुष्टात आला. त्यानंतर दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अहवालानुसार, जानेवारी 2023 मध्ये 2018 नंतर सर्वाधिक हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये 134 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 254 जण जखमी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT