पुढारी वृत्तसेवा : पुणे- बंगळुरू हायवेवर आंबेगावजवळ खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात घडला. या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 18 जखमी आहेत. मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात घडल्याच बोललं जात आहे. ट्रकने ट्रॅव्हलच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून पुणे महानगरपालिकेची ०४ अग्निशमन वाहने व ०१ रेस्क्यु व्हॅन व पीएमआरडीए कडून ०१ रेस्क्यु व्हॅन अशी एकूण ०७ अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली.
हायवेवर अपघातग्रस्त दोन्ही वाहने पलटी झाली होती. दरम्यान अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांनी प्रथमत: बसच्या मागील बाजूची काच फोडून जखमी प्रवाशांना बाहेर काढले. अग्निशमन दलाकडून एकूण १८ जखमींना बाहेर काढले असून त्यांच्यावर जवळच्याच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अपघातग्रस्त , खाजगी बस (एमएच ०३ सीपी ४४०९) निता ट्रॅव्हल्स कंपनीची असून कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास करीत होती. मालवाहतूक करणारा मोठा ट्रक (एमएच १० सीआर १२२४) यामधे मोठ्या प्रमाणात साखरेची पोती असल्याचे समजले.