जळगाव : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली होती. मात्र आता पुन्हा तापमान वाढू लागले आहे. आज जळगाव शहरातील तापमानाचा पारा 43 अंशावर गेल्याचे पाहायला मिळाले.
एप्रिल महिन्यात जळगाव जिल्ह्यातील तापमान सातारा 45 अंशावर पोहोचला होता. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून जळगाव जिल्हयात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली होती. त्यामुळे जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा तापमान वाढू लागले आहे.
गेल्या दोन दिवसात ही लाट तीव्र झाल्याने अनेकांनी दुपारच्या वेळात घरा बाहेर पडण्याचं टाळले. एरवी भर दुपारी भरभरून वाहणारे रस्ते आता मात्र अघोषित संचारबंदीसारखे निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या नागरिकांना अतिशय महत्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे ते नागरिक उन्हापासून बचाव करणाऱ्या उपाययोजना करून बाहेर पडत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी काहींनी शीतपेय तर काहींनी उसाचा रस पिण्यासाठी गर्दी केल्याचं दिसत आहे.