Latest

Telangana Elections 2023 : तेलंगाणा विधानसभेच्या ११९ जागांसाठी आज मतदान; तब्बल २२९० उमेदवार रिंगणात

दिनेश चोरगे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : तेलंगाणा विधानसभेच्या ११९ जागांसाठी आज (३० नोव्हेंबर) मतदान होणार मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिजोरम या राज्यांमधील आधीच पार पडले असल्याने तेलंगाणा मधील मतदान पूर्ण झाल्यानंतर उद्या जाहीर होणाऱ्या मतदानोत्तर कलचाचण्यांकडे (एक्झिट पोल) सर्वांचे लक्ष असेल. मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे.

तेलंगाणामध्ये के. चंद्रशेखर राव  यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भारत राष्ट्र समिती विरुद्ध कॉंग्रेस अशी प्रमुख लढत आहे. तर त्रिशंकू विधानसभा आल्यास किंगमेकर बनण्याची संधी मिळेल या रणनितीनुसार भाजपनेही सर्व ताकद पणाला लावली आहे. राज्यातील सर्व ११९ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे.

भारत राष्ट्र समिती, कॉंग्रेस, भाजप, डावे पक्ष यांच्यासह राष्ट्रीय, प्रादेशिक आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे तब्बल २२९० उमेदवार रिंगणात असून उद्या सकाळी सात ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३५६५५ मतदान केंद्रांवर ३ कोटी २६ लाख मतदार बीआरएस प्रमुख आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, कार्यकारी अध्यक्ष टी. रामाराव, भाजपचे खासदार बी संजय कुमार, सोयम बापूराव आणि अरविंद कुमार, काँग्रेसचे खासदार रेवंत रेड्डी, उत्तम कुमार रेड्डी, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यासारख्या प्रमुख उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करतील.

दरम्यान, माओवादी हिंसाचाराचा उपद्रव लक्षात घेऊन संवेदनशील १२ मतदारसंघामध्ये दुपारी चार वाजताच मतदान आवरते घेतले जाणार आहे. बंदोबस्तासाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या ३७५ कंपन्या आणि राज्य विशेष पोलिसांच्या ५० कंपन्या तसेच ४५ हजार पोलिस कर्मचारी आणि शेजारील राज्यांतील २३ हजार गृहरक्षक दलाच्या वजानांना तैनात करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT