Latest

Telangana Assembly elections : जनगावमध्‍ये भाजप-बीआरएस कार्यकर्ते भिडले

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तेलंगणा विधानसभेच्या एकूण ११९ जागांसाठी आज (दि.३०) मतदान होत आहे. राज्यभरात सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू होणार असून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. दरम्‍यान, सकाळी जानगाव येथील मतदान केंद्रावर काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी तत्‍काळ केलेल्‍या हस्तक्षेपाने परिस्थिती नियंत्रणात आली, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. इब्राहिमपत्तनम खानपूर मतदान केंद्रावरही बीआरएस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्‍याने काही काळ तणाव निर्माण झाला. (Telangana Assembly elections updates )

राज्यातील ३.२६ कोटी मतदार ३५,६५५ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यासह २,२९० उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. निवडणूक आयोगाने सर्व जिल्ह्यांमध्ये मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. (Telangana Assembly elections updates )

लोकशाही बळकट करण्याचे पंतप्रधान मोदींनी केले आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्‍या माध्‍यमातून तेलंगणातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, मी तेलंगणातील माझ्या बहिणी आणि भावांना विक्रमी संख्येने मतदान करून लोकशाहीचा सण बळकट करण्याचे आवाहन करतो. मी विशेषत: तरुण आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करतो.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT