एकदिवसीय विश्‍वचषक स्‍पर्धेत स्‍मरणीय कामगिरी करणार्‍या टीम इंडियाच्‍या खेळाडूंनी आज कुटुंबासमेवत मोठ्या उत्‍साहात दिवाळी साजरी केली. 
Latest

टीम इंडियाच्‍या खेळाडूंनी कुटुंबासोबत साजरी केली दिवाळी ( Video)

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एकदिवसीय विश्‍वचषक स्‍पर्धेत स्‍मरणीय कामगिरी करणार्‍या टीम इंडियाच्‍या ( Team India ) खेळाडूंनी आज कुटुंबासमवेत मोठ्या उत्‍साहात दिवाळी साजरी ( Diwali Celebrates) केली. बंगळूरुमधील हॉटेलमध्‍ये खेळाडू आणि त्यांचे कुटुंबीय दिपोत्‍सवानिमित्त एकत्र आले. टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफने एक दिवस आधी हा सोहळा साजरा केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ( Team India's Diwali celebrations )

टीम इंडियातील क्रिकेट खेळाडूंनी आपल्या कुटुंबासह पारंपारिक पोशाख परिधान करून धार्मिक विधींमध्ये भाग घेतला, दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली. यानिमित्त खेळाडूंना आपल्‍या कुटुंबियांसोबत वेळ व्‍यतित करता आला. खेळाडू, पती-पत्नीसह, मुले आनंदी वेळ घालवताना या व्हिडिओमध्‍ये दिसत आहे. ( Team India's Diwali celebrations )

आज (दि.१२) बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताचा नेदरलँड्सविरुद्ध सामना आहे. यंदाच्‍या विश्वचषक स्‍पर्धेतील आपली अपराजित राहण्याची कामगिरी कायम राखण्‍याच्‍यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. यंदाच्‍या एकदिवसीय विश्‍वचषक स्‍पर्धेत टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्‍या सर्व आठ सामन्यांची विजय मिळवला आहे. भारत 16 गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT