कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : भोसलेवाडी (कदमवाडी) येथे शिक्षकावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये शिक्षकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समाेर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. माझी शाळा, सुसंस्कार हायस्कूल, भोसलेवाडी येथील आवारात मुलांनी शिक्षकावर कोयत्याने हल्ला केला. संजय सुतार असे त्या शिक्षकाचे नाव आहे. ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली.
कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात सदर शिक्षकावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची अधिक चौकशी केली जात आहे. नेमका हा हल्ला कशामुळे केला याचे कारण अद्याप उघड झालेले नाही. पण मुलांनी शिक्षकाला कदमवाडी चौकात बोलावून त्याच्यावर हल्ला केल्याचे समजते.