Latest

Father Kills Daughter : प्राध्यापक पित्याकडून शिक्षिका मुलीची हत्या; बापाने मुलीवर गोळ्या झाडून स्वत:ला संपवले

अमृता चौगुले

कासगंज; पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील नागरिया (जि. कासगंज) शहरातील पॉश कॉलनीत प्राध्यापक पित्याने शिक्षिका मुलीची गोळ्या झाडून हत्या केली. नंतर स्वतःवर गोळी झाडून स्वत:लाही संपविले. मुलीला प्रेमविवाह करायचा होता. वडील त्याविरोधात होते. (Father Kills Daughter)

मैनपुरी जिल्ह्यातील मूळ रहिवासी नरेंद्र सिंह यादव नागरियातील शेरवानी इंटर कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. सदर कोतवाली परिसरातील आवास विकास कॉलनीत त्यांचा बंगला. पत्नी शशी यादव, मुलगी जुही यादव व एक मुलगा असे चौकोनी कुटुंब. मुलगा सध्या नोएडात मॅट्रिकची तयारी करत आहे. मुलगी जुही यादव कासगंज जिल्ह्यातच मिर्झापुरात एका प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. (Father Kills Daughter)

जुहीला स्वतःच्या इच्छेने (एका बँक कर्मचार्‍याशी) लग्न करायचे होते; पण वडील नरेंद्र विरोधात होते. जुहीला त्यांनी खूप समजावले; पण जुहीही ठाम होती. जुहीने आई शशीदेखत वडिलांना बजावले, मी सुशिक्षित आहे. माझे निर्णय मी स्वतः घेणार. नरेंद्र यादव यांना राग अनावर झाला. त्यांनी कपाटातून रायफल काढली आणि जुहीवर गोळ्या झाडल्या. जुहीने रायफल हिसकविण्याचा प्रयत्न केला; पण गोळी सुटलेली होती. तिच्या तळहातातून गोळी थेट तिच्या छातीत शिरली. नरेंद्र यांनी मग रायफलची नाळ स्वतःच्या गळ्याला भिडवली आणि ट्रिगर दाबला. शशी ना मुलीला वाचवू शकल्या, ना पतीला. त्या ओरडल्या आणि कोसळल्या. शेजारी धावत आले. बाप-लेकीला रुग्णालयात नेले, पण काय उपयोग होता?

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT