Tarak Mehta 
Latest

Tarak Mehta फेम सोनूने बॉयफ्रेंडला केलं प्रपोज; लव्ह बर्ड समुद्रकिनारी रोमँटिक मूडमध्ये

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील छोटी सोनू म्हणजे, अभिनेत्री झील मेहता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉयफ्रेंड आदित्य दुबेला डेट करत आहे. यानंतर आता तिने समुद्र किनारी रोमँटिक होवून आदित्यला रिंग्स परिधान केली आहे. यावेळचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करताना अनेक कलाकारांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

ठळक मुद्दे

  • अभिनेत्री झील मेहताने सोनूने केलं प्रपोज
  • झीलने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत
  • लव्ह बर्ड समुद्र किनारी 

बॉयफ्रेंड आदित्य दुबेला डेट

अभिनेत्री झील मेहता अनेक दिवसांपासून बॉयफ्रेंड आदित्य दुबेला डेट करत होती. काही महिन्यांपूर्वी आदित्यने तिला हटके पद्धतीने प्रपोज केलं होतं. यानंतर आता झीलने निवांत समुद्र किनारी रोमँटिक मुडमध्ये प्रपोज केलं आहे. यावेळीचे तिने तिच्या इंन्टाग्रामवर एकूण कोलाजसह नऊ फोटोज शेअर केलं आहेत. यातील प्रत्येक फोटोत हे कपल हातात हात घालून समुद्र किनारी फिरताना दिसले आहे.
झीलने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जेव्हा मी तुझ्यासोबत असते तेव्हा माझे मन फुलपाखरे होते. पुन:पुन्हा एकाच गोष्टीच्या मागेमागे मन पळते आणि शेवटी तुझ्याजवळ येवून थांबते. हे सत्य आहे. यातील पाचव्या फोटोच्या हे घडले आहे. माझी स्वप्ने सत्यात उतरवल्याबद्दल धन्यवाद. असे तिने लिहिले आहे.

कॉमेंन्टसचा पाऊस

पांढऱ्या मिडी ड्रेसमध्ये झील खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी खास करून झीलने दुडघ्यावर बसून आदित्याला हटके पद्धतीने प्रपोज केलं आहे. झीलने त्याला हिऱ्याची अंगठीही घातली आहे. फोटोंमध्ये दोघेही एकमेकांना हग करताना आणि एकमेकांचे हात धरताना दिसत आहेत. कपलचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. तारक मेहता मालिकेतील कोमल भाभी म्हणजेच अभिनेत्री अंबिकासह अनेक चाहत्यांनी दोघांचे अभिनंदन करताना कॉमेंन्टस् केल्या आहेत.

झील कंपनी चालविते

झीलने २००८ मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये पहिल्यांदा सोनूची भूमिका साकारली होती. यानंतर अभिनेत्रीने शिक्षणाचे कारण देत शो सोडला. झील आता या सिनेइडस्ट्रीतून बाहेर असून ती सेफ स्टुडंट हाऊसिंग नावाची कंपनी चालवते. तर आदित्य गेमिंग इंडस्ट्रीशी संबंधित आहे. मात्र, या कपलने त्याच्या लग्नाची तारीख किंवा याबाबतची अधिकृत्त कोणतीच माहिती दिलेली नाही.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT