tamannaah Bhatia  
Latest

Tu Aa Dilbara : तमन्ना भाटियाने केले ‘कावला’चे हिंदी गाणे लाँच

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्या आगामी 'जेलर' चित्रपटातील तिच्या चार्टबस्टर गाणं कावला हे सध्या ट्रेंड होत आहे. या गाण्याने खूप यश मिळवलं आहे. (Tu Aa Dilbara) फूट-टॅपिंग तमिळ गाण्याने इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवल्यानंतर या गाण्याचं हिंदी व्हर्जन "तू आ दिलबरा" धमाकेदारपणे लाँच झालं. तमन्नाने तिच्या इन्स्टावर काही फोटोज अपलोड करत Can't get enough of Kaavaalaa? Here's #Tu Aa Dilbara अशी कॅप्शन लिहिलीय.

या कार्यक्रमात तमन्ना भाटियाने मीडियाच्या काही सदस्यांसह गाण्याचे व्हायरल हुक स्टेप सादर करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कावला गाणं शिल्पा राव यांनी गायले आहे तर त्याचे हिंदी गाणं सिंधुजा श्रीनिवासन यांनी गायले आहे. रकीब आलम यांनी हे गाणं लिहिले आहे.

इन्स्टाग्राम रील्सवर कावला हे एक ट्रेंडिंग होत आहे. असंख्य लोकांनी त्याच्या आकर्षक बीट्सवर स्वतःचे व्हिडिओ शेअर केले आहेत. "‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍तू आ दिलबरा" हे गाणं देखील प्रेक्षकांची मने जिंकून घेणार यात शंका नाही!

जेलर व्यतिरिक्त तमन्ना भाटियाचे अनेक नवीन प्रोजेक्ट्स आहेत. तेलुगुमध्ये भोला शंकर, मल्याळममध्ये बांद्रा आणि तमिळमध्ये अरमानाई ४ लवकरच रिलीज होणार असल्याचं समजतंय. निखिल अडवाणीच्या "वेदा" या हिंदी चित्रपटात तमन्ना जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT