Latest

Taliban Crisis वर सर्वपक्षीय नेत्यांची चर्चा होण्याची शक्यता

backup backup

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तानमध्ये घडत असलेल्या घडामोडींवर (Taliban Crisis) भारत लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र मंत्रालयाला सांगितले आहे की, "संसदेच्या प्रत्येक पक्षातील खासदारांना अफगाणिस्तानातील सर्व घटनाक्रमांची माहिती द्यावी", अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र खात्याला निर्देश दिले आहेत की, "संसदेच्या दोन्ही सभागृहातील राजकीय पक्षांच्या खासदारांना अफगाणिस्तच्या परिस्थितीची सर्व माहिती देण्यात यावी." यासंदर्भात पुढील माहिती कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून देण्यात येणार आहे.

सध्या अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि अफगाणींना बाहेर काढण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. काबुलमधून दिवसाला २ उड्डाणं करण्याची परवानगी भारताला मिळाली आहे. यामध्ये अफगाणिस्तानातील हिंदू, शिख यांच्यासोबत अफगाणी मदतनीसांना बाहेर काढण्याचा प्रयत्न भारत करत आहेत.

तसेच ज्यांना भारताच्या मदतीची गरज आहे, त्यांना भारताकडून मदत दिली जाईल, असं आश्वासनही भारताकडून देण्यात आलं आहे. यापूर्वीच काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांनी अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर मोदी सरकार विरोधकांशी संवाद का साधत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर केंद्र सरकारने परराष्ट्र खात्याला सूचना दिल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तान घडामोडींविषयी (Taliban Crisis) येत्या २६ ऑगस्टला सर्वपक्षीय बैठक परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बोलावली आहे. रविवारी भारतीय सी-१८ या विमानानं १६८ जणांना अफगाणिस्तानातून आणलं आहे. त्यात १०७ जण भारतीय नागरिक आहेत.

पहा व्हिडीओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT