कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा :
जिल्ह्यातील तलाठ्यांच्या रिक्त ५६ जागांसाठी तब्बल ४९ हजार १८५ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. या पदांसाठी गुरुवारपासून जिल्ह्यातील आठ -केंद्रांवर परीक्षा सुरू झाल्या आहेत. तब्बल १९ दिवस) ही परीक्षा सुरू राहणार आहे. (Talathi Exam)
राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षेला आज प्रारंभ झाला. यामध्ये जिल्ह्यातही आठ केंद्रांवर दररोज तीन सत्रांत परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या कालावधीपूर्वी अगोदर तीन दिवस संबंधित उमेदवाराला परीक्षेचे रिसीट उपलब्ध होणार आहे.
२२ पथके तैनात
या केंद्रांवर होणार परीक्षा
जे. जे. मगदूम महाविद्यालय, जयसिंगपूर, डी.के.टी.ई. इचलकरंजी, तात्यासाहेब कोरे महाविद्यालय, वारणानगर, संजीवन महाविद्यालय, पन्हाळा, विकासवाडी, शिये, सायबर व न्यू पॉलेटेक्निक, उचगाव या आठ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
परीक्षा केंद्रांवर मोबाईल जामर
सर्व परीक्षा केंद्रांवर मोबाईल जामर बसविण्यात आले आहेत. याखेरीज प्रत्येक केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर असून त्याद्वारे उमेदवारांवर लक्ष ठेवले जाणार आहे. याखेरीज प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.