वीज 
Latest

वीज कोसळल्‍यानंतर अशी घ्‍या काळजी; जमिनीवर आलेनंतर पाहा काय होते?

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पावसाळा सुरू झााला की वीज चमकताना दिसतात. परंतु अनेकांना प्रश्न पडला असेल नेमकं वीज आहे तरी काय? वीज तयार कशी होते? ती जमिनीवर पडल्‍यानंतर त्‍यांचे काय होते? 'नासा'ने याबाबत माहिती दिली आहे. 1-20 पेक्षा अधिक ढग एकमेकांवर जोरदार आदळतात. यामूळे ढगांमध्ये वादळासमवेत मोठी प्रकाशमान विद्युत शक्ती उत्सर्जित होते. तसेच वीज ही पृथ्वीच्या वातावरणात असणारा प्रचंड भाराचा विद्युत प्रवाह असतो.

वीज कोसळल्‍यानंतर… : 

अतिउच्चदाबाची वीज ज्या वेळी कोसळते त्‍यावेळी ती १० कोटी वॅट प्रवाहित करते आणि त्‍यादरम्‍यान सर्वोच्च तापमान म्‍हणजे ३०,०००˚ से. किंवा त्याहीपेक्षा जास्त असू असते. या प्रचंड उष्णतेमुळे वीजे कोसळल्‍यांनतर त्‍याच्या मार्गात येणा-या काहीही आले तर त्‍यांची वाफ होऊन जाते. तसेच विद्युत उर्जेतील उष्णता प्रचंड वाढल्‍याने त्‍या मार्गातील हवेचा दाबाचे स्फोटात रूपांतर होवून त्‍याची तीव्रता वाढते आणि त्यामुळे वीजेची मोठी गर्जना निर्माण होते. त्‍यास विजांचा कडकडातही म्‍हटले जाते.

वीज पडण्यामागचा धोका : 

वीज पडण्यामागचा धोका काय आणि त्‍याची तीव्रता कळण्यासाठी विज्ञान समजून घेणं गरजेचे आहे. 'नासा'ने याबाबत म्‍हटले की, आकाशात लखलखणाऱ्या विजा हा विद्युत ऊर्जेचा प्रकार आहे. बेंजामिन फ्रँकलीन या अमेरिकी शास्त्रज्ञाने 1752 मध्ये सिद्ध करण्यासाठी एक प्रयोग केला. तो असा की वीज कडकडत असताना पतंगाला चावी बांधून त्याने आकाशात उडवली. तसेच एक किल्ली त्याच्या हातात ठेवली. वीज कडाडल्यावर त्या किल्लीवर ठिणग्या पडल्‍या. आणि त्‍यावर धन-ऋण आहे हे समोर आले.

आकाशातल्या विजेचे प्रकार : 

ढगातून जमिनीकडे येणारी वीज हा एक मुख्य प्रकार आहे. प्रति सेकंद 100 विजा पृथ्वीवर धडकत असतात. प्रत्येक विजेत जवळपास एक अब्ज व्होल्ट एवढी विद्युत ऊर्जा असू शकते. ढगांच्या खालच्या बाजूला ऋण वीज तयार होते त्‍यावेळी त्‍यांची पायऱ्यांसारखी मालिका तयार होते. तेव्हा वीज ही तीन लाख किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने जमिनीकडे येते. प्रत्येक पायरी साधारण 150 फूट लांबीची असते. जेव्हा सर्वांत खालची पायरी धन प्रभाराने भारित असलेल्या वस्तूपासून 150 मीटर अंतरावर येते, तेव्हा ती तिकडे आकृष्ट होते. ही वस्तू एखादी इमारत, झाड किंवा एखादी व्यक्तीही असू शकते. ढगांचा ऋण आणि त्या वस्तूचा धन या दोन्हींमधून वीज प्रवाह वाहत असतो आणि वीज कोसळताना दिसते. तिचा वेग तब्बल 300 लाख किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो.

वीज कोसळल्‍यानंतर होणारे धोके : 

वीज कोसळण्यापूर्वी होणारे धोक्‍याबाबत लोकांमध्ये जनजागृती केल्‍याने ते आपत्तीपूर्व तयारी योग्य प्रकारे करू शकतात. लोकांना जास्तीत जास्त सुरक्षित ठिकाणी आसरा घेणे आवश्यक आहे. लोकांनी मोकळ्या जागेत लहान टेकडी, झाड, झेंड्याचे खांब, प्रेक्षपण मनोरा अशा जमीनीपासून फार उंच असलेल्या जागांचा आश्रय घेवू नये. तर बंदिस्त इमारती, चारचाकी वाहने वीजेच्या बचावासाठी सुरक्षित असतात. भारतातमध्ये महाराष्ट्रात वीज कोसळून होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच जास्‍तीत जास्‍त मत्यू हे शेतात काम करणाऱ्या लोकांचे होतात. एकूण मृत्युपैकी ८६ टक्के मृत्यू शेतात काम करणाऱ्या व्यक्तींचे होतात, असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT