Latest

Gurcharan Singh : तारक मेहता का उल्टा चष्मा फेम गुरुचरण सिंग बेपत्ता

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही मालिकेत रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याच्या कुटुंबीयांकडून गुरूचरण सिंग बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेता गुरूचरण सिंग (Gurcharan Singh) सोमवारपासून बेपत्ता आहे. ही माहिती त्याच्या वडिलांनी दिल्ली पोलिसांना दिली आहे. गुरुचरण सिंग सोमवारी दिल्ली विमानतळावरून मुंबईला जात होता, पण तो ना मुंबईला पोहोचला ना घरी परतला. त्याच्या वडिलांनी दिल्ली पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी गुरचरण सिंगच्या (Gurcharan Singh) अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, त्याआधारे पोलिस तपास करत आहेत. आतापर्यंत केलेल्या तपासात समोर आले आहे की, गुरुचरण सिंह (Gurcharan Singh) २२ एप्रिल रोजी सकाळी मुंबईला जाण्यासाठी घरातून निघाला होता. सकाळी साडेआठ वाजता दिल्ली विमानतळावरून त्याचे मुंबईसाठी विमान होते. पण त्याने ना फ्लाईट घेतली ना मुंबई गाठली. पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे, ज्यामध्ये गुरुचरण सिंग तेथून जाताना दिसत आहे. त्याचा फोन देखील २४ एप्रिलपर्यंत सुरू होता, परंतु आता तो बंद आहे. बेपत्ता होण्यापूर्वी गुरचरण सिंग फोनवर कोणाशी बोलला होता का, याचा पोलीस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT