Taapsee Pannu Wedding  
Latest

Taapsee Pannu Wedding Video Leaked : ब्रायडल लूकमध्य़े तापसीच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तापसी पन्नूने मॅथियास सोबत विवाह केल्याचे वृत्त समोर आले. पण, त्यांच्या लग्नातील कोणताही फोटो अथवा व्हिडिओ समोर आला नव्हता. आता तापसीचा लग्नातील व्हिडिओ समोर आला आहे. लग्नाच्या १२ दिवसानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, तापसी – मॅथियासचे उदयपूरमध्ये लग्न झाले. या व्हिडिओमध्ये तापसी पंजाबी स्टाईल वधू वेषात डान्स करत मॅथियास जवळ येताना दिसत आहे. मॅथियास देखील शीख लूकमध्ये दिसत आहे. तो मॅथियास आहे ओळखून येत नाही.

कसा होता लूक?

तापसीने एक अनारकली टाईप पंजाबी सूट घातला होता. सोबत वेणीत परांदा, हातात चुडा आणि कलीरे असा फुल पंजाबी ब्राईड दिसत होती. व्हायरल व्हिडिओमध्ये आधी मॅथियासला हार घालताना दिसते मग मॅथियास पुढे येऊन गळ्यात हार घालताना दिसतो.

तापसीने अद्यापपर्यंत अधिकृतपणे आपल्या लग्नाची घोषणा केलेली नाही न तिने कोणतीही पोस्ट लिहिली.

video- varindertchawla instagram वरून साभार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT