वॉशिंग्टन : लोक कशाचा विक्रम करतील हे काही सांगता येत नाही. हँगरला कपडे (T Shirt Hanger) लावण्याचे काम तसे तुम्ही दररोज करत असाल. यात काही फार मेहनतीची किंवा प्रशिक्षणाची गरज नाही; पण तुम्हाला क्षुल्लक वाटणारे हे काम करूनही वर्ल्ड रेकॉर्ड करता येऊ शकतो याचा तुम्ही कधी विचार तरी केला होता का? पण अमेरिकेतील एका व्यक्तीने ते केले. आपण करत असलेल्या या कामाचा त्याने असा वापर केला की गिनिज बुकमध्ये त्याची नोंद झाली आहे. याचा व्हिडीओही व्हायरल होतो आहे.
गिनिज बुकमध्ये (T Shirt Hanger) नोंद होणे हे वाटते तितके सोपे नाही. किती तरी लोकांचे हे स्वप्न असते आणि ते पूर्ण करण्यासाठी ते खूप मेहनत घेतात. आपल्याजवळ असलेले टॅलेंट वापरतात किंवा काहीतरी विचित्र करून संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतात. पण गिनिज बुकमध्ये नाव हवे यासाठी काही वेगळे, हटके, मोठे करण्याची गरज नाही हे अमेरिकेतील डेव्हिड रशने दाखवलेे आहे.
आपल्या दैनंदिन कामातूनही आपण जगात भारी आहोत हे सिद्ध करू शकतो. डेव्हिड रश याने हँगरला टी-शर्ट (T Shirt Hanger) लटकवण्याचा अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय सोप्पच आहे! तुम्हाला जितकं वाटतं तितकं हे सोपं नाही. कारण प्रत्येक रेकॉर्डस्साठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्चे नियम असतात. ज्याच्यात पात्र ठरल्यावरच लोकांना रेकॉर्डमध्ये सहभागी करून घेतले जाते. डेव्हिडलाही या नियमांमुळे बर्याच समस्या आल्या.
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्च्या नियमानसार डेव्हिडने आपल्या टी-शर्टचा (T Shirt Hanger) वापर केला होता, ज्याचा गळा खूप मोठा होता. त्यामुळे त्याला टी-शर्टस् बदलावे लागले त्याने नंतर रेकॉर्डस्साठी बायकोचे टी-शर्टस् वापरले; पण तेव्हा त्याचे हँगर्स खूप लहान होते. पण नियमांचे पालन करत त्याला टी-शर्ट त्याच हँगरला लटकवावे लागले, ज्यामुळे त्याला थोडा जास्त वेळ लागला; पण तरी त्याने फक्त 16 सेकंदात 5 टी शर्टस् हँगरला लटकवले आणि आपला एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. 2015 साली हा रेकॉर्ड जपानच्या कॅटो कोजुमीने केला होता. त्याला यासाठी 27.93 लागले होते. तर डेव्हिडने हे 16.78 सेकंदात करून दाखवून हा रेकॉर्ड आपल्या नावावर करून घेतला. डेव्हिडने आतापर्यंत 250 पेक्षा जास्त वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत.