Latest

Swadeshi Varun Drone : भारतीय नौसेनेत लवकरच दाखल होणार माणसांना घेऊन उडणारा ‘स्वदेशी ड्रोन वरूण’ (पाहा व्हिडिओ)

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Swadeshi Varun Drone  भारतीय नौसेनेत लवकरच पायलट रहित माणसांना घेऊन उडणारा 'संपूर्ण स्वदेशी ड्रोन वरुण' समाविष्ट केला जाईल. नवी दिल्लीत आयोजित स्वावलंबन कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समोर याचे नुकतेच प्रदर्शन करण्यात आले. संपूर्ण परीक्षणानंतरच नौसेनत हे दाखल करून घेतले जाईल. भारतीय नौसेना याचा प्रथमच युद्धात वापर करेल.

Swadeshi Varun Drone  सामान किंवा माणसांना एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी वाहून नेणारा वरुण ड्रोन हा संपूर्ण स्वदेशी आहे. सागर डिफेन्स या कंपनीने याची निर्मिती केली आहे. नौसेनाकडून कंपनीला हा प्रोजेक्ट देण्यात आला होता. दीड वर्षात निर्मीती पूर्ण करण्याची डेटलाइन देण्यात आली होती.

Swadeshi Varun Drone  हे ड्रोन संपूर्ण स्वयंचलित आहे. त्यामध्ये चार ऑटोपायलट मोड देण्यात आले आहेत. त्यामुळे एखादे रोटर खराब झाले तरी हे लांब अंतरापर्यंत उडू शकते. वरुण ड्रोन स्वयंचलित असल्याने माणसाला यात फक्त आणि फक्त बसायचे आहे. सध्या याचे जमिनीवरील ट्रायल पूर्ण झाले आहे. तर पुढील तीन महिने याचे समुद्रात परीक्षण करण्यात येणार आहे.

सध्या जी परीक्षणे करण्यात आली त्यामध्ये एका जहाजावरून दुस-या जहाजात सामान पोहोचवण्यात वरुण ड्रोन यशस्वी ठरले आहे. भविष्यात याचा उपयोग जखमी सैनिकांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी केला जाऊ शकतो.

Swadeshi Varun Drone  असा होईल नौसेनाला उपयोग

नौसेनेला अधिकाधिक सक्षम बनवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अधिकाधिक उपकरणांची गरज आहे. सध्या नौसेनेच्या एका जहाजातील सामान अन्य जहाजावर न्यायचे असेल तर दोन्ही जहाजांना एकमेकांच्या जवळ घेऊन यावे लागते. त्यानंतर एका जहाजातून दुस-या जहाजात माल शिफ्ट करण्यात येते. ही खूप वेळ खाऊ प्रक्रिया आहे. वरुण ड्रोन नौसेनत समाविष्ट केल्यानंतर हे काम कमी वेळेत जास्त चांगल्या पद्धतीने होईल. सध्या या ड्रोनची समुद्रामध्ये चाचणी घेण्यात येत आहे. संपूर्ण परीक्षणानंतर हा ड्रोन नौसेनेत दाखल करण्यात येईल.

Swadeshi Varun Drone काय आहे वरुण ड्रोनची वैशिष्ट्ये

  • एका उड्डाणात 30 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते.
  • 100 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता
  • जमीनीपासून दोन मीटरपर्यंत वर उडेल
  • समय सीमा 25 ते 33 मिनिट असेल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT