Latest

Sunil Gavaskar : सुनील गावसकर यांच्याकडून सूर्यकुमारची पाठराखण, म्हणाले…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सूर्यकुमार यादवने (suryakumar yadav) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील निराशाजनक कामगिरीला मागे टाकून इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) धावा करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जेणेकरून आगामी वनडे विश्वचषक (ODI WC) स्पर्धेपूर्वी तो गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवू शकेल,' असे म्हणत भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर सुनील गावसकर (sunil gavaskar) यांनी जगातील नंबर वन टी-20 फलंदाजाची पाठराखण केली आहे.

सूर्याकुमार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या फ्लॉप ठरला. तिन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्याची पहिल्याच चेंडूवर शिकार केली. अशा प्रकारे सूर्याने गोल्डन डकची हॅट्ट्रीक करून लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला. वनडे मालिकेत सलग तीन वेळा पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद होणारा सूर्या हा पहिला फलंदाज ठरला आहे. टी-20 मध्ये आपल्या फलंदाजीचा पराक्रम दाखवणारा हा फलंदाज वनडेमध्ये आपल्या क्षमतेनुसार कामगिरी करू शकलेला नाही, त्यामुळे सूर्याच्या संघातील स्थानावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

गावसकर (sunil gavaskar) म्हणाले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही सामन्यांमध्ये शून्यावर बाद होणे ही चिंतेची बाब आहे. पण जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजासोबत असे घडू शकते, यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. असे असले तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील खराब कामगिरीमुळे त्याचे वर्ल्डकप संघातील स्थान धोक्यात आले आहे. त्याने निराश न होता, अगामी आयपीएलवर ध्यान द्यावे. या स्पर्धेत धावा केल्यास तो मागिल अपयशातून नक्कीच बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT