पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र त्याला तीन सामन्यांपैकी केवळ एकच कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. आता मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी सूर्यकुमार गल्लीत क्रिकेट खेळताना दिसला. यावेळी त्याने आपल्या अनोख्या शैलीत शॉट्स मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.( Suryakumar Yadav viral video ) सूर्यकुमारच्या अनोख्या फटक्याने जमलेल्यांना लुटले आहे. या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. सूर्याच्या या शॉटला चाहते 'सुपला शॉट' म्हणत आहेत.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणार्या सूर्यकुमारने गल्ली क्रिकेटमध्येही आपली फलंदाजीतील बेदरकार वृत्ती दाखवत चाहत्यांची मने जिंकली. मुंबई इंडियन्स वन फॅमिलीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार कोणत्या पद्धतीने हा शॉट खेळला याची चर्चा आहे. वास्तविक, गोलंदाजाने गोलंदाजी करताच सूर्याने आपली बॅट जमिनीवर ठेवली आणि फाइन लेगच्या दिशेने चौकार मारला. या शॉटला त्याच्या चाहत्यांनी 'सुपला शॉट' असे म्हटले आहे. केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नाही तर आयपीएलमध्येही आता 'सुपला शॉट' पाहण्यासाठी आम्ही आतूर आहोत, असे त्याच्या चाहत्यांनी म्हटले आहे.
आयपीएलपूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिका खेळणार आहे. या वर्षी वन-डे क्रिकेट विश्वचषकही होणार आहे. सूर्यकुमार क्रिकेटमधील या फॉर्मेटमध्यही आपल्या फलंदाजीचा करिष्मा कायम ठेवले आणि भारताला विश्वचषक जिंकून देईल, अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.
हेही वाचा :