Latest

Suryakumar Yadav : सूर्यकुमार त्याच्या जिवलग मित्रासाठी ठरतोय ‘खलनायक’! ‘या’ क्रिकेटरचे करिअर धोक्यात

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) बॅट चांगलीच तळपली. या सामन्यात सलामीवीर म्हणून खेळणाऱ्या सूर्यकुमारने टीम इंडियाला एकहाती सामना जिंकून दिला. मात्र सूर्यकुमारची ही शानदार खेळी त्याच्या मित्रासाठी मोठी खलनायक बनली आहे. कारण आता 'त्या' खेळाडूला भारतीत संघात स्थान मिळवण्यासह सध्या सुरू असलेल्या विंडीजविरुद्धच्या मालिकेतच खेळणे अशक्य असेल असे जाणकरांचे म्हणणे आहे.

'या' खेळाडूसाठी सूर्यकुमार ठरतोय खलनायक

तिस-या टी 20 सामन्याआधी पर्यंतचा वेस्ट इंडिज दौरा सूर्यकुमार यादवसाठी (Suryakumar Yadav) खराब गेला. मात्र तिस-या टी 20 सामन्यात त्याने धमाकेदार खेळी करत पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. या मालिकेत सूर्यकुमारला सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळाली असून, या संधीचा फायदा घेत त्याने आपलाच मित्र इशान किशनसाठी टेन्शन वाढवले ​​आहे. इशान हा सलामीचा फलंदाज आहे. तो विंडीजविरुद्धच्या या मालिकेत रोहित शर्मासह डावाची सुरुवात करेल अशी शक्यता होती. मात्र तिस-या टी 20 सामन्यातील सूर्यकुमारच्या स्फोटक खेळीनंतर इशानला संघात स्थान मिळणे कठीण होणार आहे.

'सूर्य' नावाचे वादळ (Suryakumar Yadav)

सूर्यकुमार (Suryakumar Yadav) याआधी कधीच सलामीवीर म्हणून खेळताना दिसला नव्हता. पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने एकूण 35 धावा केल्या. त्यानंतर त्याच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र तिस-या टी 20 सामन्यात त्याने 172.72 च्या स्ट्राइक रेटने 44 चेंडूत 76 धावांची वादळी खेळी करत चोख प्रत्युत्तर दिले. त्याची बॅट चांगली तळपली आणि चौकार-षटकारांची आतषबाजी झाली. सूर्यकुमार आणि इशान किशन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. दोघांमध्ये चांगली मैत्री सुद्धा आहे. मात्र सूर्यकुमारने विंडीजविरुद्धच्या सामन्यात सलामीला येत धडाकेबाज अर्धशतक झळकावल्याने इशानसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.

इशान रोहितसह अनेकवेळा सलामीला

ईशान किशन अनेक प्रसंगी टीम इंडियाकडून सलामीवीर म्हणून खेळला असून त्याने कर्णधार रोहितसह डावाची सुरुवात केली आहे. आयपीएल 2022 नंतर त्याला सलामीवीर म्हणून भारतीत संघात अनेक सामने खेळायला मिळाले आणि त्याने चांगली कामगिरीही केली. भारतीय संघाला काही दिवसांतच आशिया चषकही खेळायचा आहे, त्यामुळे इशान किशनला संघात स्थान मिळणे मोठे आव्हान असेल. इशानने टीम इंडियासाठी आतापर्यंत 18 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 31.29 च्या सरासरीने 532 धावा केल्या आहेत. त्याने 4 अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याचवेळी, इशानने भारताकडून 3 वनडे खेळताना 29.33 च्या सरासरीने 88 धावा केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT