Latest

Collegium Petition : कॉलेजियम संबंधी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी; न्यायालयाने मागितीला ॲटर्नी जनरल यांचा सल्ला 

backup backup
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाने कॉलेजियम (Collegium Petition) प्रस्तावांना अधिसूचित करण्यासाठी सरकारला निश्चित कालमर्यादा ठरवून देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी केली. ॲटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी यांचा सल्ला मागितला आहे. सरन्यायाधीश डी.व्हाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्या.जे.बी.पारडीवाला आणि न्या.मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी घेतली.

याचिकेतून सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम द्वारे शिफारस करण्यात आलेल्या न्यायाधीशांच्या नियुक्तीला अधिसूचित करण्यासाठी केंद्र सरकारला एक निश्चित कालमर्यादा ठरवून देण्याची मागणी करण्यात आली होती. वकील हर्ष विभोर सिंघल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेत न्यायालयाने याचिकेची एक प्रत एजी कार्यालयाला देण्याचे निर्देश दिले.एजींनी न्यायालयाची मदत करावी, असे खंडपीठ म्हणाले. पुढील सुनावणी ८ सप्टेंबरला घेण्यात येईल.

याचिका न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम प्रणालीला आव्हान देणारी नाही,तर ही एक व्यापक न्यायालयीन स्वातंत्र्यासाठी कॉलेजियम प्रणाली आणखी एकजुट आणि बळकट करण्याचा प्रयत्न करते,असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

निश्चिम वेळमर्यादे अभावी कॉलेजियम द्वारे प्रस्तावित नावांची नियुक्ती अधिसूचित करण्यासाठी सरकार मनमानी पद्धतीने विलंब करतो.न्यायालयीन स्वातंत्र्यांवर याचा परिणाम होतो.घटनात्मक आणि लोकशाहीचा आदेश धोक्यात टाकला जातो आणि न्यायालयाच्या दूरदृष्टीचा अपमान केला जातो, असे याचिकेतून सांगण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT