Latest

Sunrisers vs Super Kings : तळचे भिडणार ‘टॉपर’शी

Arun Patil

शारजाह; वृत्तसंस्था : 'प्ले-ऑफ'च्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या सनरायझर्स हैदराबादची (Sunrisers vs Super Kings) आयपीएलमध्ये आज (गुरुवारी) गुणतक्त्यात पहिल्या स्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्जशी गाठ पडेल. धोनी ब्रिगेड हैदराबादविरुद्धही आपली विजयी वाटचाल कायम राखण्याचा प्रयत्न करेल.

सलग पाच पराभवांनंतर केन विल्यम्सच्या अर्धशतकाच्या बळावर हैदराबादने पहिला विजय मिळवला. हैदराबादने दहा सामन्यांपैकी आठ गमावले आहेत. त्यांचे सध्या एकूण चार गुण आहेत. दरम्यान, संघ व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेताना सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नरला उर्वरित सत्रात संधी न देण्याचा निर्णय घेतला आहे. वॉर्नरच्या नेतृत्वाखाली 2016 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.

मात्र, वॉर्नरच्या भविष्याबद्दलची चर्चा जोर धरू लागली आहे. अशा स्थितीत केन विल्यम्सवर मोठी जबाबदारी असणार आहे. दरम्यान, इंग्लंडच्या जेसन रॉयने हैदराबादच्या पराभवाची मालिका खंडित करताना 60 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. यामुळे यापुढेही रॉयकडून चांगल्या खेळीची संघाला अपेक्षा असेल.

दरम्यान, धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने सलग तीन विजय मिळवत 'प्ले ऑफ'मधील प्रवेश जवळ जवळ निश्चित केला आहे. रविवारी केकेआरविरुद्ध जडेजाने आठ चेंडूंत 22 धावांचा काढत चेन्नईला विजय मिळवून दिला होता. तर, प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना व अंबाती रायडू यांच्यामुळे मधली फळी भक्कम बनली आहे. गायकवाडने दुसर्‍या सत्रात 40, 38 व नाबाद 88 धावा काढल्या आहेत.

चेन्नईसाठी गोलंदाजी ही चिंतेची बाब ठरू लागली आहे. याचा फायदा सनरायझर्स उठवू शकतात.

संघ यातून निवडणार : (Sunrisers vs Super Kings)

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, लुंगी एन्गिडी, दीपक चहर, इम्रान ताहिर, फाफ-डू-प्लेसिस, रॉबिन उथप्पा, कर्ण शर्मा, जोश हेझलवूड, जेसन बेहरेनडोर्फ, कृष्णप्पा गौतम, सँटेनर, साई किशोर, हरि निशांत, एन. जगदीशन, पुजारा, आसिफ, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा.

सनरायझर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, शेरफन रुदरफोर्ड, ऋद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, राशीद खान, विजय शंकर, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलिल अहमद, टी. नटराजन, बासिल थंपी, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, अब्दुल समद, जे. सुचित, जेसन होल्डर, विराट सिंह, प्रियम गर्ग, केदार जाधव, मुजिब-उर-रहमान, जेसन रॉय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT