पुढारी ऑनलाईन डेस्क : सनी लिओन तिच्या आगामी केनेडी चित्रपटाच्या रिलीजसाठी सज्ज आहे. (sunny leone ) ती कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत तिच्या पहिल्या प्रोजेक्टसाठी उत्सुक असल्याचं दिसतंय. कान्ससाठी काऊंटडाऊन सुरु झाले असून दोन आठवड्यात हा खास सोहळा रंगणार आहे. याआधी, सनी लिओनीने चित्रपटातील एक नवे पोस्टर रिलीज केलं आहे. (sunny leone )
७६ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिडनाईट स्क्रिनिंगसाठी प्रतिष्ठित ज्युरींनी निवडलेला "केनेडी " हा एकमेव भारतीय चित्रपट आहे. तिने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे-"2 आठवडे बाकी आहेत! #Kennedy's canne countdown to Cannes is on! ⏲️⏲️"
सनी चा हा लूक नक्कीच प्रेक्षकांची मन जिंकून घेणारा आहे. सनीचे काही रोमांचक चित्रपट लवकरच येणार आहेत सध्या सध्या ती केनेडीसाठी खूप उत्साहित आहे. केनेडी चित्रपटगृहांमध्ये लवकरच प्रदर्शित होण्याची वाट प्रेक्षक बघत आहेत.