सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक. ( संग्रहित छायाचित्र ) 
Latest

सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक, सार्वजनिक स्वच्छतेचे प्रणेते बिंदेश्वर पाठक यांचे निधन

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक, सार्वजनिक स्‍वच्‍छतागृहाचे प्रणेते बिंदेश्वर पाठक यांचे आज (दि.१५) निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. सकाळी प्रकती बिघडल्‍याने त्‍यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्‍यांचे निधन झाल्‍याचे सूत्रांनी सांगितले. त्‍यांच्‍या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ( Sulabh founder Bindeshwar Pathak )

सामाजिक कार्याला केले जीवन समर्पित

सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक या नात्याने पाठक यांनी आपले संपूर्ण जीवन मानवाधिकार, पर्यावरणीय स्वच्छता, उर्जेचे अपारंपरिक स्त्रोत आणि शिक्षणाद्वारे कचरा व्यवस्थापन यांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित केले होते. स्वच्छतेबाबत पाठक यांच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे १७४९ शहरांमध्ये कोरड्या शौचालयांचे टू-पिट पोर फ्लश शौचालयांमध्ये रूपांतर झाले. १,६०८३५ शौचालये बांधली गेली. ( Sulabh founder Bindeshwar Pathak )

सार्वजनिक स्‍वच्‍छता क्षेत्रातील कार्याची आंतरराष्‍ट्रीय पातळीवरही दखल

त्‍बिंदेश्वर पाठक यांच्‍या सार्वजनिक स्‍वच्‍छता क्षेत्रातील कार्याची दखल आंतरराष्‍ट्रीय पातळीवरही घेण्‍यात आली होती. 2003 मध्ये त्यांना ग्लोबल 500 रोल ऑफ ऑनरमध्ये समाविष्ट करण्यात आले. २००९ मध्‍ये त्यांना प्रतिष्ठित स्टॉकहोम वॉटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.एनर्जी ग्लोब अवॉर्ड, बेस्ट प्रॅक्टिसेससाठी दुबई इंटरनॅशनल अवॉर्ड आणि पॅरिसमधील फ्रेंच सिनेटचा लीजेंड ऑफ प्लॅनेट पुरस्कारांनीही त्‍याचा सन्‍मान करण्‍यात आला होता. केंद्र सरकारने त्‍यांच्‍या कार्याचा गौरव पद्मभूषण पुरस्काराने केला होता. 2020 मध्ये, 'नमस्ते, बिंदेश्वर पाठक!' हे त्यांच्या कार्याची माहिती देणारे पुस्तक. प्रकाशित झाले होते. २०१६ मध्ये न्यूयॉर्कचे महापौर बिल डी ब्लासिओ यांनी १४ एप्रिल हा दिवस बिंदेश्वर पथक दिवस म्हणून घोषित केला होता.

देशाचे मोठे नुकसान : पंतप्रधान नरेंद्र मोदी

बिंदेश्वर पाठक यांच्‍या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. शोकसंदेशात पंतप्रधान मोदींनी म्‍हटलं आहे की, डॉ. बिंदेश्वर पाठक यांचे निधन हे आपल्या देशाचे मोठे नुकसान आहे. ते एक दूरदर्शी होते ज्यांनी सामाजिक प्रगतीसाठी आणि दलितांच्या सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर कार्य केले. सामाजिक प्रगती आणि दलितांना सशक्त करण्यासाठी त्‍याने विशेष योगदान दिले.

पाठक यांनी स्वच्छतेच्या क्षेत्रात क्रांतिकारी पुढाकार घेतला : राष्‍ट्रपती

सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक श्री. बिंदेश्वर पाठक यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. श्री पाठक यांनी स्वच्छतेच्या क्षेत्रात क्रांतिकारी पुढाकार घेतला होता. त्यांना पद्मभूषणसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मी त्यांचे कुटुंबीय आणि सुलभ इंटरनॅशनलच्या सदस्यांप्रती शोक व्यक्त करते, अशा शब्‍दांमध्‍ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बिंदेश्वर पाठक यांना श्रध्दांजली वाहिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT