पुढारी ऑनलाईन डेस्क : सुकेश चंद्रशेखर यांनी तुरुंगातून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. केजरीवाल यांना ईडीकडून ६ दिवसांची कोठडी मिळाल्यानंतर त्यांनी हे पत्र लिहिले आहे. यात त्याने लिहिले आहे की, प्रिय भाऊ, तिहारमध्ये आपले स्वागत आहे. नेहमीप्रमाणे सत्याचा विजय झाला आहे, असे सुकेशने लिहिले आहे. Sukesh on Arvind Kejriwal
कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, हे दाखवण्यासाठी नव्या भारताच्या शक्तीचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. माझे प्रिय अरविंद केजरीवाल जी, सर्वप्रथम मी तुमचे स्वागत करण्यास उत्सुक आहे. केजरीवाल तिहार क्लबचे 'बॉस' असे वर्णन करत तुमची सर्व विधाने आणि धर्मांध प्रामाणिकपणाचे नाटक आता संपुष्टात आले आहे, अशी टीकाही करण्यात आली आहे.
वाढदिवसापूर्वी डबल सेलिब्रेशनची संधी Sukesh on Arvind Kejriwal
सुकेशने पुढे पत्रात उपरोधिकपणे लिहिले आहे की, मी खूप भाग्यवान आहे की, माझा वाढदिवस तीन दिवसांनी २५ मार्चला आहे. हा दिवस माझ्यासाठी दुहेरी उत्सव आहे, कारण मी तुझ्या अटकेला माझ्या वाढदिवसाची सर्वोत्तम भेट मानतो. केजरीवाल जी, सत्य जास्त काळ लपून राहू शकत नाही. तुमचा सगळा भ्रष्टाचार उघड होणार आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना किमान 10 वेगवेगळे घोटाळे करून दिल्लीतील गरिबांना लुटले आहे. तुम्ही केलेल्या10 घोटाळ्यापैकी मी स्वतः 4 घोटाळ्यांचा साक्षीदार आहे. याचे माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत. मी तुम्हाला पूर्णपणे उघड करणार आहे. तुम्हाला ज्या 4 घोटाळ्यांची भीती वाटत होती. त्यामध्ये तुमच्याविरुद्ध मी सरकारी साक्षीदार बनेन.
तुम्हाला आणि तुमच्या भ्रष्टाचाराची आणि कर्माची शिक्षा स्वतः भगवान श्रीरामांनी दिली आहे. विशेषत: तुमचा अहंकार आणि तुमची लबाडी आता समोर आली आहे. लोकांच्या भावनांशी तुम्ही खेळत आहात. म्हणूनच तुम्ही शून्यावर आला आहात. तुरुंगात जाण्याने तुम्हाला काही फरक पडत नाही. तुरुंग पूर्णपणे तुमच्या ताब्यात आहे आणि तुरुंग अधिकारी तुमचे हातातील बाहुले आहेत. पण हेही मी उघड करणार आहे. तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांनी मला एक महान ठग म्हटले होते.
तुम्ही तिहार क्लबमधून विधानसभेची निवडणूक लढवाल. मी तुमच्या विरोधात निवडणूक लढवून माझा प्रामाणिकपणा सिद्ध करेन. पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही आणि तुमचे सर्व भ्रष्ट सहकारी आणि तुमची तथाकथित आम आदमी पार्टी संपुष्टात येईल. देशातील जनता तुम्हाला त्यांच्या व्यवस्थेतून कायमची हाकलून देतील.
हेही वाचा