सुजी ढोकळा 
Latest

Weight loss Recipe : सूजीने बनवा हलका नाश्ता, कधीच नाही वाढणार वजन!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्हाला सकाळी सकाळी काय नाश्ता बनवायचा, हा प्रश्न नेहमीच पडला असेल. डाएटिंग म्हणून आपण तेलकट, मसालेदार पदार्थ खात नाही. रोज पोहे, उपमा तर आपण खातोच. (Weight loss Recipe) पण उपम्याचाच जर वेगळा पदार्थ चाखायला मिळाला तर कुणाला आवडणार नाही. यासाठी तुम्ही सूजीपासून उत्कृष्ट चवदार पदार्थ बनवू शकता. ज्यामुळे तुमचे पोटही भरेल आणि तुमचे वजन नियंत्रित करू शकते. सूजीपासून वेगवेगळे पदार्थ बनवून तुम्ही सकाळी पोटभर नाश्ता सर्वांनाच खाऊ घालू शकता. (Weight loss Recipe)

सूजीला सेमोलिना नावानेही ओळखले जाते. सूजीचा शिरा, सूजीच्या पुऱ्या, सूजीचा उपमा असे विविध पदार्थ बनवले जातात. दाक्षिणात्य पदार्थांमध्ये आणि मिठाईमध्ये याचा भरपूर उपयोग केला जातो. खूप कमी लोकांना माहिती आहे की, सूजी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे.

सूजी पचायला हलकी असते. त्यामुळे लहान मुलांनादेखील सूजी दिली जाते. तुमचे वजन जर वाढले असेल तर वजन नियंत्रित करण्यासाठी सूजी एकदम परफेक्ट आहे. सूजीपासून ही पुढील रेसिपी बनवता येईल.

सूजीचा ढोकळा (Rava Dhokla)

साहित्य-

अर्धा कप- ओट्स पावडर
अर्धा कप – दही
अर्धा कप – सूजी
अर्धा चमचा- आले
तेल- एक मोठा चमचा
हींग- चिमूटभर
मोहरी- अर्धा छोटा चमचा
हिरवी मिरची- ४
२ चमचे- कापलेली कोथिंबीर
१ कप- पाणी
ढोकळा स्टँड
मीठ
थोडी साखर
दही
थोडेसे इनो.

कृती-

सूजी चाळून घ्या. थोडे-थोडे पाणी घालत सूजी आणि ओट्सची घट्ट पेस्ट बनवा. त्यामध्ये गाठी राहू नयेत, यासाठी मिश्रण चांगल्या प्रकारे हलवा. त्यामध्ये लिंबूचा रस, चवीनुसार मीठ, दही घालावे. सोबत हिरवी मिरची आले पेस्ट घालून मिश्रण तयार करावे.
ढोकळ्याच्या साच्याला तेल लावून ठेवावे. दुसरीकडे, कुकरमध्ये २-३ कप पाणी घालून गॅस मोठा करून गरम करण्यासाठी ठेवावे. सूजी पेस्टमध्ये थोडे इनो घालून मिश्रण हलवा. आता हे मिश्रण साच्यामध्ये ओतून कुकरमध्ये ठेवावे. कुकरचे टोपण लावावे. पण कुकरची शिट्टी होऊ नये, याची काळजी घ्यावी. शिटी होण्याआधी गॅस बंद करावा.

गॅस कमी आचेवर ठेवून २० मिनिटे वाफेवर शिजवावे. नंतर कुकर उघडून ढोकळा शिजला आहे की नाही तपासावे. जर ढोकळा अधिक ओला दिसत असेल तर २-३ मिनिटे पुन्हा शिजवावे. नंतर थंड होण्यासाठी बाहेर काढावे.

चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घ्यावे. पॅनमध्ये तेल घालून गरम करून घ्यावे. त्यामध्ये हिंग, मोहरी, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी टाकावी. या फोडणीत एक कप पाणी आणि साखर घालून उकळून घ्या. गॅस बंद करा. ही तयार फोडणी ढोकळ‍्यावर घाला. ढोकळा तयार आहे!…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT