Latest

दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय ब्राह्मणच असतात : सुजात आंबेडकर

backup backup

औरंगाबाद, पुढारी ऑनलाईन : राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात केलेल्या विधानावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर म्हणाले होते की, "राज ठाकरेंनी पुत्र अमित ठाकरे यांनी हनुमान चालिसा म्‍हणायला लावावी" या विधानाचा अर्थ स्पष्ट करत सुजात आंबेडकर म्हणाले की, "आतापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या. आपण हेच बघितले की दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय ब्राह्मण असतात. त्यांच्या वक्तव्यानंतर प्रवाहित होऊन दंगलीत उतरतात प्रत्यक्षात ती बहुजन मुलं असतात."

औरंगाबादमधील एमजीएम महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात सुजात आंबेडकर उपस्थित होते. त्यावेळी माध्यमांशी बाेलताना ते म्‍हणाले, की, "माझं राज ठाकरेंना एवढंच म्हणणं होते की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहुजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवा.  तुम्ही स्वत:च्या मुलाला उतरवणार नसाल तर मग दुसऱ्यांच्याही मुलांना उतरवू नका".

सुजात आंबेडकर पुढे म्हणाले, "२०१४ मध्ये लोकांच्या भूकमारीचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न असे सर्व आश्वासन देऊन सत्तेत आला. पण सत्तेत आल्यावर कोणीही यावर बोलायला तयार नाही. करोना काळात सर्व आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली होती, त्यावर कुणीही बोलत नाही. असं असतानाही जर भाजपा किंवा राज ठाकरे असेच हिंदू-मुस्लिम दंगलीवर बोलत असतील तर येथील लोकांना भावनिक धर्माच्या प्रश्नांमध्ये अडकून ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचा सरळसरळ अर्थ होतो", अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT