पुढारी ऑनलाईन डेस्क : द आर्चिज मधून शाहरुखची कन्या सुहाना खान (Suhana Khan) चित्रपट इंडस्ट्रीत डेब्यू करणार आहे. दरम्यान, ती क्रीम कलर साडीमध्ये स्पॉट झाली. यावेळी सुहानाला साडी सांभाळणे कठीण झाले होते. तिचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये सुहाना खान साडीमध्ये दिसतेय. तिचं ग्लॅमर रुप या साडीमध्ये आणखी खुलून दिसतेय. ती या लूकमध्ये गाडीमध्ये बसताना दिसतेय. ती आपली साडी सावरताना दिसतेय. (Suhana Khan)
सुहाना खानचे याआधी ब्लॅक आऊटफिटमधील फोटो व्हायरल झाले होते. तिच्या एका मित्राने एक फोटो पोस्ट केला आहे, यामध्ये ती कारमध्ये ट्रॅव्हल दरम्यान मोबाईलवर कोणाशी तरी बोलताना दिसतेय, यावेळी ती हसतानाही दिसतेय. हा फोटो सुहाना खानने आपल्या इन्स्टा स्टोरीवर रीपोस्ट केला आहे, या कॅप्शनमध्ये लिहिलंय-, 'My Su.'
सुहाना 'द आर्चिज' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटामध्ये स्टारकिड्स दिसणार आहेत. जोया अख्तरचा हा चित्रपट असून आपल्या करिअरची सुरुवात ती करणार आहे. हा चित्रपट थिएटर्समध्ये नाही तर नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.
सुहाना खानसोबत अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदादेखील दिसणार आहे. त्याला या चित्रपटातून लॉन्च केलं जाणार आहे. याशिवाय, खुशी कपूर, तारा शर्मा सलूजा, मिहिर अहूजा, युवराज मेंडा आणि वेदांग रैनादेखील 'द आर्चीज'मध्ये दिसणार आहेत.