Latest

Sudhakar Badgujar Inquiry : सुधाकर बडगुजर यांची दोन तास चौकशी 

गणेश सोनवणे

नाशिक : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा शूटर सलीम कुत्ता याच्यासोबत डान्स करतानाचा व्हिडिओ आमदार नितेश राणे आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी उघडकीस आणताच शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची पोलिस आयुक्तांकडून तब्बल दोन तास चौकशी करण्यात आली. अमली पदार्थविरोधी कार्यालयात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त सीताराम कोल्हे यांनी बडगुजर यांची चौकशी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तत्पूर्वी बडगुजर यांचे समर्थक पवन मटाले व अन्य दोघांची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या सर्वांची नाशिक क्राइम ब्रँचच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे. त्या सर्वांना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाणार असून, सत्य माहिती जाणून घेतली जाणार आहे. या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश आहेत.

– विजय ढमाळ, पोलिस निरीक्षक, क्राइम

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT