Latest

Subrato Roy Sahara : सुब्रतो राय यांच्या निधनानंतर सहाराचे गुंतवणूकदार होणार ‘बेसहारा’?

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन : सहाराश्री म्हणून प्रसिद्ध असलेले सुब्रतो रॉय यांचं नुकतेच निधन झाले आहे. पण रॉय यांच्या निधनानंतर  सहाराच्या लाखो गुंतवणूकदारांना एकाच प्रश्न पडला आहे तो म्हणजे त्यांच्या गुंतवणुकीच काय होणार? सहारामध्ये अडकलेल्या पैशांचे काय होणार हा प्रश्न होता. गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमेचा रिफंड त्यांना मिळणार का याबाबत अनेक शंकाही व्यक्त केल्या जात आहेत. या गुंतवणूकदारांसाठी त्यांचा बुडालेला पैसा परत देण्यासाठी केंद्र सरकारने नुकताच एक पोर्टल लॉंच केलं आहे. या पोर्टलच्या मदतीने पैसे बुडालेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत दिले जात आहेत. सहारा रिफंड पोर्टल असं या पोर्टलच नाव आहे. रॉय यांच्या मृत्यूचा यावर काही परिणाम होणार नाही असं बोललं जात आहे.

सुप्रीम कोर्टाने 2012  मध्ये सहारा गुंतवणूकदारांना दिलासा देत त्यांचे पैसे व्याजासहित परत करण्याचा आदेश दिला. याचा फायदा जवळपास तीन कोटी गुंतवणूकदार घेणार आहेत. https://mocrefund.crcs.gov.in/ या साईटद्वारे गुंतवणूकदारांना त्यांचा रिफंड घेता येणार आहे. सहारा ग्रुपच्या चार को- ओपरेटीव सोसायटीमध्ये सहारा गुंतवणूकदारांचा पैसा आहे. या रिफंडसाठी ऑनलाइन क्लेम करणं गरजेचं आहे.

याशिवाय आवश्यक ते कागदपत्रही ऑनलाइनच उपलोड करायचे आहेत. व्हेरीफीकेशनंतर हा रिफंड मिळू शकतो. हा रिफंड हप्त्या-हप्त्याने दिला जाणार आहे. या क्लेमला कोणतेही शुल्क आकारल जात नाहीये. काही अडचण आल्यास 1800 103 6891 / 1800 103 6893 या टोल फ्री नंबरवर कॉल करण्यास सांगितले जात आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT