पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील २४ तासांत तिसरा मोठा भूकंपाने तैवान (Taiwan Earthquake) हादरले. रविवारी सकाळी जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.८ इतकी नोंदवली गेली आहे. यानंतर दुपारी ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. तैवानच्या दक्षिण-पूर्व भागात शनिवारी प्रथम ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्का बसला हाेता.
तैवानला शनिवारी ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला हाेता. रविवारी सकाळी ६.८ तर दुपारी ७.२ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. दक्षिण-पूर्व भागातील काही इमारती जमीनदोस्त झाल्या तर काही रस्त्यांना तडे गेले आहेत. या नुकसानीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल हाेत आहेत.
तैवानच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, युली येथील एका इमारतीतून चार जणांची सुटका करण्यात आली. तैवान रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व तैवानमधील डोंगली स्टेशनवर ट्रेनचे सहा डबे रुळावरून घसरले. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही.सुमारे 600 लोक सिनिक चीक आणि लियुशिशी पर्वतीय भागात अडकले आहेत.
तैवानबरोबर जपान आणि चीनमधील काही परिसरालाही भूकंपाचे धक्के जाणवले. शनिवारपासून आजपर्यंत या तिन्ही देशांना सुमारे ५० हून अधिक भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपानंतर तैवान, जपान आणि चीनमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या २४ तासांत जगातील सहा देश भूकंपाने हादरले आहेत. भारताच्या काही राज्यांना देखील हे धक्के जाणवले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तैवान, जपान, चीनमध्ये कालपासून या तिन्ही देशांमध्ये ५० हून अधिक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तैवानमधील भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, येथील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. रस्त्यांच्या मधोमध खड्डे पडले आहेत. अनेक पूलही तुटल्याचे दिसून येत आहे. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल हाेत आहेत.
त्सुनामीमुळे जपानच्या दक्षिणेकडील बेटांना धोका निर्माण होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जपानी अधिकाऱ्यांनी किनार्याजवळ राहणाऱ्या लोकांना तात्काळ स्थलांतरित होण्यास सांगितले आहे. तैवान हा तीन प्रमुख टेक्टोनिक प्लेट्सच्या मध्याजवळ असलेल्या जटिल टेक्टोनिकच्या प्रदेशात वसले आहे. याच्या पूर्व आणि आग्नेय दिशेला फिलिपाईन सी प्लेट, उत्तर आणि पश्चिमेस युरेशिया प्लेट आणि नैऋत्येस सुंडा प्लेट आहे. १८ सप्टेंबर २०२२ च्या भूकंपाचे स्थान हे Ryukyu सबडक्शन झोनच्या दक्षिणेला आहे. हे फिलीपीन समुद्र आणि युरेशिया प्लेट्सच्या सीमेजवळ आहे.
earthquake.usgs.gov या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत तैवान, जपान, चीन, अफगाणिस्तान, म्यानमार, भारत (मेघालय) येथे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सर्वात वाईट स्थिती तैवानची आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के शहराच्या उत्तरेला 50 किलोमीटर अंतरावर (स्थानिक वेळेनुसार) दुपारी २.४४ वाजता जाणवले. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किमी खाली होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.८ इतकी मोजली गेली आहे.
तैवानमध्ये भूकंपाने हाहाकार माजवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी १९९९ मध्ये झालेल्या भूकंपातही भयंकर विध्वंस झाला होता. त्यानंतर दोन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. दीड लाखांहून अधिक लोक बेघर झाले. सुमारे १५,००० लोक जखमी झाले. यानंतर २०१६ मध्ये मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला हाेता.
हेही वाचा