Latest

शेअर बाजाराची ‘सुस्त’ चाल, सेन्सेक्ससह निफ्टीमध्‍येही घसरण

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मागील चार सत्रांमध्‍ये तेजीची घोडदौड कायम ठेवलेला भारतीय शेअर बाजार आज ( दि.१३) सपाट उघडला. बाजार उघडताच प्रमुख निर्देशांक लाल रंगात व्यवहार करू लागले. BSE सेन्सेक्स 60 अंकांची घसरण अनुभवत 69,500 च्या खाली आला आहे तर निफ्टी देखील 20900 च्या खाली व्यवहार करत आहे.

आयटी, बँकिंग शेअर्सची सर्वाधिक विक्री

बाजारात आज प्रारंभीच्‍या व्‍यवहारात सर्वाधिक विक्री आयटी, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील समभागांमध्ये दिसून आली. टीसीएस, ओएनजीसी आणि इन्फोसिसचे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरण अनुभवत आहेत. तर आयशर मोटर आणि एनटीपीसीचे शेअर्स प्रत्येकी 1% वाढीसह व्यवहार करत आहेत.

सार्वकालिन उच्‍चांकानंतर 'तेजी'ला ब्रेक

याआधी मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा सार्वकालिक उच्चांक गाठल्यानंतर दिवसभरातील नीचांकी पातळी गाठली. अखेर बाजारातील व्‍यवहार बंद होताना सेन्‍सेक्‍स 394.82 अंकांनी घसरण अनुभवत 69,539.19 वर स्‍थिरावला तर निफ्‍टी 20,901.35 वर बंद झाला. याआधी सोमवारी (दि.११) सेन्सेक्स 69,928 वर बंद झाला होता.

जागतिक बाजारातून सकारात्‍मक संकेत

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या व्‍याज दराच्‍या निर्णयापूर्वी जागतिक बाजारातून चांगले संकेत मिळत आहेत. तसेच आशियाई बाजारातूनही संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. रुपया 1 पैशांनी मजबूत झाला आहे. रुपया ८३.३९/डॉलरच्या तुलनेत ८३.३८/डॉलरवर उघडला.

कच्‍च्‍या तेलाच्‍या दरात मोठी घसरण

अमेरिकेच्या किरकोळ महागाईच्या आकडेवारीनंतर कच्च्या तेलात मोठी घसरण दिसून येत आहे. कच्च्या तेलाची किंमत सुमारे ४ टक्‍के घसरल्‍या असून, ७३ डॉलरच्‍या च्या खाली गेली आहे. याचा सकारात्‍मक परिणाम ओएमसी, पेंट आणि एव्हिएशन शेअर्संमध्‍ये दिसेल असे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT