मागील शुक्रवारी शेअर बाजाराने दाखवलेला हिरवा बावटा पाहून पूर्ण आठवड्यात हळूहळू का होईना; परंतु तेजीची गाडी मार्गक्रमण करत राहिली. निफ्टी आणि सेन्सेक्स अर्धा-अर्धा टक्क्यांनी वाढले आणि अनुक्रमे 19653.50 व 65995.63 वर बंद झाले. सेन्सेक्स 66000 च्या उंबरठ्यावर आहे आणि निफ्टी 19500 च्यावर आहे. या दोन्ही गोष्टी आशादायक आहेत.
बँक निफ्टी पूर्ण सप्ताहात सपाट राहिला. शुक्रवारच्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची मिटिंग हे त्याचे कारण. रेपो रेटेमध्ये काहीही बदल न होता, तो 6.50 टक्के राहिला. रिझर्व्ह बॅँकेची ही सलग चौथी द्वैमासिक सभा ज्यामध्ये रेपो रेटमध्ये बदल करण्यात आला नाही. रेपो रेटप्रमाणेच 2024 या आर्थिक वर्षात GDP वाढीचे उद्दिष्टही 5.4 टक्के स्थिर राहिले. 147 पॉईंटस्नी वाढून बँका, निफ्टीने आरबीआयच्या या 'रेपो रेट जैसे थे' निर्णयाचे स्वागत केले.
13 व्या एकदिवशीय क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन भारताकडे आहे. 5 ऑक्टोबर सुरू झालेली ही स्पर्धा 19 नोव्हेंबरपर्यंत चालेल. हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई, कोलकाता आदी दहा प्रमुख शहरांमध्ये सामने होतील. या स्पर्धेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला Boost मिळेलच. शिवाय Hospitality and Tourism सेक्टरला त्याचा सर्वात जास्त थेट लाभ होईल. इंडिगोचा शेअर आठवड्यात सव्वा सात टक्के वाढला. त्यामागचे कारण हे आहे. 2530 रुपये हा त्याचा शुक्रवारचा भाव आहे आणि लवकरच तो 3000 रुपयापर्यंत जाईल. विश्वचषक स्पर्धा तोंडावर असणारा दीपावलीचा सण, कंपनीने आपल्या तिकीट दरामध्ये केलेली वाढ आणि 90 रुपयांच्या खाली गेलेला क्रूड ऑईलचा दर या सार्या गोष्टी इंडिगोला वाढण्यास मदत करतील. इंडिगोबरोबरच खालील कंपन्या विश्वचषकाच्या प्रमुख आणि थेट लाभार्थी असतील.
IRCTC
Zomato
Chalet Hotels
Indian Hotels
Lemon Tree Hotels
वर उल्लेख केल्याप्रमाणे कमी झालेल्या क्रूड ऑईल दरांचा फायदा पेंटस्, टायर्स आणि केमिकल्स सेक्टर्सना होईल. त्या द़ृष्टीने बर्जर पेंटस्, एशियन पेंटस्, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, विनाती ऑरगॉनिक्स या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा विचार करावा. गेल्या आठवड्यात ज्या शेअर्सनी 52 Week High चा उचांक गाठला, त्यापैकी खालील तीन शेअर्स पाहा. हे शेअर्स आणि ते ज्या सेक्टर्समध्ये काम करतात ते सेक्टर्स शक्यतो फारसे चर्चेत नसतात.
Kaynes Technology India Ltd हा शेअर आज 2460 रुपयांना मिळतो आहे. ही कंपनी ToT (Internet of things) क्षेत्रात काम करते. ToT म्हणजे आपल्या दैनंदिन व्यवहारांतील गोष्टींपासून (अगदी किचन अप्लायन्सेस, कार वगैरे) ते इंडस्ट्रीयल प्रॉडक्शन्स इंटरनेटला जोडणे.
Global Health (750.80 रुपये) हा दुसरा शेअर आज 52 Week High ला ट्रेड करतो आहे. कार्डियोलॉजी, न्युरो सायन्स, ऑन्कालॉजी, ऑर्थापेडिक्स लिव्हर ट्रान्सप्लांट, युरोलॉजी या क्षेत्रात काम करणार्या या कंपनीचे Medanta या बॅ्रंडच्या अंतर्गत पाच हॉस्पिटल्स आहेत.
Syrma SGS (647 रुपये) ही कंपनी उद्योगांना Electronic Manufacturing Services पुरवते. हा शेअरसुद्धा आज 52 Week High च्या पातळीवर आहे.
सध्या सुरू असणारी विश्वचषक स्पर्धा आणि पाठोपाठ येणारा दसरा-दिवाळीचा सणासुदीचा हंगाम पाहता बाजारात चांगलीच हालचाल राहील. FMCG Consumption प्रॉडक्टस् तेजीत येतील. Consumer Durables ना मागणी वाढेल. सुट्टीच्या दिवसांमध्ये देशांतर्गत पर्यटन वाढेल. त्या द़ृष्टीने या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स अवश्य घ्यावेत.