SSC GD Constable 2022  
Latest

SSC GD Constable 2022 : जीडी कॉन्स्टेबलच्या ४५ हजार पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : एसएससी जीडी कॉन्स्टेबल 2022 (SSC GD Constable 2022) रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. एसएससी जीडी कॉन्स्टेबल पदाच्या सुधारीत जागांची संख्या जाहीर करण्यात आली आहे. सुधारित रिक्त पदांनुसार कॉन्स्टेबलची एकूण 45 हजार 284 पदे भरली जाणार असून 30 नोव्हेंबर अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांसाठी एसएससी जीडी कॉन्स्टेबल (SSC GD Constable 2022)  सुधारित रिक्त जागा अधिकृत वेबसाइटवर अधिसूचित करण्यात आल्या आहेत. कर्मचारी निवड आयोगाने CAPF, SSF, आसाम रायफल्समधील रायफलमन (GD) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो परीक्षा 2022 मध्ये शिपाई यांच्यासाठी सुधारित रिक्त जागा ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या आहेत.

जीडी कॉन्स्टेबल भरतीच्या सुधारित रिक्त पदांनुसार कॉन्स्टेबलची एकूण 45,284 पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी 40,274 पुरुष उमेदवारांसाठी, 4,835 महिला उमेदवारांसाठी आणि 175 NCB साठी आहेत. रिक्त पदांच्या यादीनुसार बीएसएफमध्ये 20,765 पदे, सीआईएसएफमध्ये 5,914 पदे, सीआरपीएफमध्ये 11,169 पदे, एसएसबीमध्ये 2,167 पदे, आईटीबीपीमध्ये 1,787 पदे, एआरमध्ये 3,153 आणि एसएसएफ 154 पदे भरली जाणार आहेत. यापूर्वी या भरती प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार्‍या रिक्त पदांची संख्या 24 हजार 369 होती.

एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी 27 ऑक्टोंबरपासून अर्ज भरण्यास सरू झाले असून ३० नोव्हेबर अंतिम तारीख आहे. ज्या उमेदवारांनी अजूनही अर्ज केलेला नाही त्यांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जावून अर्ज करू शकता.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT