नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रभू श्रीराम आणि नाशिक यांचे अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी नाशिक शहरामध्ये रामनवमी हा सण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जात असतो. रामजन्मोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीरामजन्मानिमित्त शहरात गरुड तसेच रामरथाची मिरवणूक काढण्याची पूर्वापार परंपरा आहे. या पेशवेकालीन परंपरेची जबाबदारी पार पाडण्यासाठीही अनेक मंडळे तसेच घराण्यांची नियुक्ती केली गेलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर रामरथाची सजावटीसाठी जय्यत तयारी सुरु आहे.
तसेच, अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या रामनवमीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे एकादशीला पंचवटीतील श्री काळाराम मंदिर येथून श्री रामरथाची मिरवणूक काढण्यात येते. त्यासाठी जय्यत तयारी सुरू असून, रथमार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे डांबरीकरण करून बुजविताना मनपाच्या पंचवटी विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी पहा फोटो. (सर्व छायाचित्रे : रुद्र फोटो)