पुढारी ऑनलाईन : काॅंग्रेस नेते राहुल गांधी सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात केलेले भाषण चर्चेचा विषय बनले आहे. पेगाससच्या माध्यमातून त्यांच्या फोनची हेरगिरी करण्यात आल्याची माहिती स्वत: खुद्द गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणावरून त्यांनी विद्यापीठातील भाषणात भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचे म्हणत, लोकशाहीच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
लंडन विद्यापीठातील भाषणात राहुल गांधी पुढे म्हणाले की, भारतातील विरोधी पक्षांच्या लोकांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवले जात आहे त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. विरोधकांवर चुकीचे गुन्हे दाखल होत असल्याने आम्ही सर्वजण सतत दबाव अनुभवत आहे. कोणतेही कारण नसताना माझ्यावर देखील गुन्हे दाखल केले जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
विरोधी पक्षातील नेत्यांना ज्याप्रकरे फसवून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. हे भारतात लोकशाही धोक्यात आसल्याचे मोठे उदाहरण आहे. मीडिया आणि लोकशाही संरचनेवर हल्ले होत आहेत, त्यामुळे लोकांशी मुक्तपणे संवाद करणे देखील कठीण झाले असल्याचे राहुल गांधी म्हणाले. विरोधी पक्षाच्या लोकांना ज्या पद्धतीने गोवले जात आहे ते चुकीचे आहे याचे हे जिवंत उदाहरण आहे. ते म्हणाले की मीडिया आणि लोकशाही संरचनेवर हल्ला होत आहे, त्यामुळे लोकांशी संवाद साधणे खूप कठीण झाले आहे.
मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांच्या फोनमध्ये पेगासस टाकून त्यांची हेरगिरी केली जात आहे. माझ्या फोनमध्येही पेगासस होता, त्यामुळे तुमचा फोन रेकॉर्डिंग होत असल्याची माहिती खुद्द गुप्तचर अधिकाऱ्यांनीच दिली होती, असे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.