भारता विरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी टीम साऊदीने न्यूझीलंडच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. File photo
स्पोर्ट्स

भारत दौऱ्यापूर्वी टीम साऊदी न्‍यूझीलंडच्‍या कर्णधारपदावरुन पायउतार

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी टीम साऊदीने (Tim Southee) न्यूझीलंडच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. आता १६ ऑक्टोबरपासून सुरु होणार्‍या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिकेसाठी न्‍यूझीलंड संघाचे नेतृत्त्‍व यष्टीरक्षक-फलंदाज टॉम लॅथम याच्‍याकडे सोपविण्‍यात आले आहे.

न्‍यूझीलंड संघाने २०२१ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन जिंकली. मात्र नुकतेच गले येथे श्रीलंकेविरुद्ध 2-0 असा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. केन विल्यमसनने 2022 च्या अखेरीस पायउतार झाल्यापासून टीम साऊदीकडे न्यूझीलंड कसोटी संघाचे नेतृत्त्‍व आले. १४ पैकी सहा कसोटी सामन्यांमध्ये विजय आणि तर दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले होते.

संघाच्या हितासाठी कर्णधार पद सोडले : टीम साऊदी

मी कर्णधार पद सोडण्‍याचा घेतलेला निर्णय हा संघाच्या हिताचा आहे. मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत संघाला प्रथम स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला विश्वास आहे की हा निर्णय संघासाठी सर्वोत्तम आहे.”नवा कर्णधार म्हणून मी टॉथ लॅथम याला पाठिंबा असेल, असे टॉम लॅथमने म्‍हटलं आहे.

व्‍यक्‍तिगत कामगिरीवर लक्ष केंद्रित करेन

“मला विश्वास आहे की मी मैदानावरील माझ्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करून आणि माझे सर्वोत्तम देऊन संघाची अधिक चांगली सेवा करू शकेन. मी सतत विकेट्स घेऊन संघाला मदत करू शकतो आणि न्यूझीलंडला कसोटी सामने जिंकण्यास मदत करू शकतो.”, असा विश्‍वासही त्‍याने व्‍यक्‍त केला आहे.

उत्तम खेळाडू आणि चांगले नेत्तृत्‍व

टीम साऊदी सध्या भारतात या महिन्याच्या कसोटी मालिकेत खेळण्‍यासाठी सज्‍ज आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड म्‍हणाले की, "टिम एक विलक्षण खेळाडू असून, त्‍याच्‍याकडे नेत्तृत्‍व गुणही आहेत. तो सुमारे 17 वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असलेला न्यूझीलंड क्रिकेटचा एक आदर्श असा सेवक आहे. टिम हा खरा टीम मॅन आहे आणि त्याने संघाचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. टीम साऊदी आमच्या आतापर्यंतच्या महान खेळाडूंपैकी एक आहे." आताआमच्या कसोटी संघात त्याची भूमिका पाहायची आहे." भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १६ ऑक्टोबरपासून बेंगळुरूमध्ये सुरुवात होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT