स्पोर्ट्स

भारत ‘अ’ संघाचा न्यूझीलंड ‘अ’वर 113 धावांनी विजय

दिनेश चोरगे

बंगळूर; वृत्तसंस्था :  सौरभ कुमारने घेतलेल्या 5 विकेटस्च्या जोरावर भारत 'अ' संघाने न्यूझीलंड 'अ' संघाचा दुसरा डाव 302 धावांत गुंडाळून त्यांच्यावर 113 धावांनी दणदणीत विजय मिळवला. बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चार दिवसीय अनधिकृत कसोटी सामन्यावर भारताने पहिल्या दिवसापासूनच वर्चस्व राखले. भारत 'अ' संघाने पहिल्या डावात 293 तर दुसर्‍या डावात 7 बाद 359 धावा केल्या. तर पाहुण्या संघाचा पहिला डाव 237 आणि दुसरा डाव 302 धावांत गुंडाळला.

सामन्याच्या शेवटच्या दिवशी सलामीवीर ज्यो कार्टरने एका बाजूने किल्ला लढवला. त्याने डेन क्लेव्हर (44) आणि मार्क चॅपमन (45) यांच्या मदतीने झुंज दिली. कार्टरने शतक झळकावले; परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्यांचा संपूर्ण डाव 302 धावांत संपुष्टात आला. ज्यो कार्टर नवव्या विकेटच्या रूपात बाद झाला. त्याने 111 धावा केल्या. भारत 'अ'कडून पहिल्या डावात 4 विकेटस् घेणार्‍या सौरभ कुमारने दुसर्‍या डावात पाच विकेटस् घेतल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT